पुणे : मार्चअखेरमुळे बाजारातील उलाढाल मंदावली | पुढारी

पुणे : मार्चअखेरमुळे बाजारातील उलाढाल मंदावली

पुणे : आर्थिक वर्षअखेरच्या महिन्यामुळे येथील घाऊक बाजारातील उलाढाल मंदावली असून साखर, गूळ, अन्नधान्यांचे दर स्थिर होते. मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने मिरची दरात मोठी वाढ झाली. तूरडाळीचे दरही आणखी वधारले. आवक-जावक साधारण असल्यामुळे साखर, गूळ, अन्नधान्यांचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

मार्चअखेरीमुळे बाजारात सध्या ग्राहकांची वर्दळ कमी असून उलाढाल मंदावली आहे. आर्थिक व्यवहारांची पूर्तता करण्याकरिता बरीच रक्कम गुंतवावी लागते, यामुळे या महिन्यात नेहमीच उलाढाल कमी प्रमाणात होते. यंदा मिरचीचे उत्पादन कमी प्रमाणात झाले असून दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे मिरची आणखी कडाडली आहे. गेल्या आठवड्यात सर्व प्रकारच्या मिरचीचे दर क्विंटलमागे आणखी आठशे ते एक हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या घाऊक बाजारात मिरचीचा प्रतिक्विंटलचा दर पंचवीसशे ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

सध्याचे हे दर आतापर्यंतचे विक्रमी मानण्यात येत आहेत. यामुळे उन्हाळ्यात मिरचीची खरेदी करून वषर्भरासाठी मिरची पावडर तयार करून ठेवणार्‍या गृहिणींना मिरचीचा चांगलाच ठसका लागणार आहे. नवी आवक सुरू झाल्यामुळे धन्याचे दर मात्र क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांनी उतरल्याचे सांगण्यात आले.

तूरडाळ आणखी कडाडली
सध्या सर्वच डाळींचे दर तेजीत आहेत. तूरडाळीचे दर सातत्याने वाढत असून गेल्या आठवड्यातही दरात आणखी पाचशे रुपयांनी वाढ झाली. मूगडाळ, हरभराडळीचे दरही तेजीतच होते. नवीन मालाची आवक सुरू झाल्यामुळे मटकीचे दर मंदीत आहेत. हिरव्या वाटाण्याच्या दरातही क्विंटलमागे तीनशे रुपयांनी वाढ झाली. आवक-जावक साधारण असल्यामुळे अन्य सर्व कडधान्यांचे दर स्थिर होते.
नवा गहू तसेच गावरान ज्वारीची नियमितपणे आवक होत आहे. सर्व प्रकारचा माल उपलब्ध झाला आहे. तसेच दरही बर्‍यापैकी उतरले आहेत. यामुळे वर्षभराची एकदम खरेदी करणार्‍या ग्राकांची पावले मार्केट यार्डाकडे वळू लागली आहेत. गेल्या आठवड्यात गहू, ज्वारी, बाजरी तसेच तांदळाचे दर टिकून असल्याचे सांगण्यात आले.

चालू महिन्यासाठी मुबलक प्रमाणात साखरेचा कोटा उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा मुबलक असून मागणी साधारण असल्यामुळे दर स्थिर होते. गुढीपाडव्याचा सण असूनही गुळास अपेक्षित मागणी नव्हती, यामुळे गुळाच्या दरात कसलाही बदल आढळला नाही.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3475-3500 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2750-2825, रिफाईंड तेलः 2600-3400, सरकी तेल 1650-2000, सोयाबीन तेल 1725-1880, पामतेल 1500-1750, सूर्यफूल रिफाईंड तेल 1700-1850, वनस्पती तूप 1475-1925, खोबरेल तेल 2250 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसुरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3500-3800, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3200-3300, एम.पी. लोकवन नं.1 3400-3600, नं.2 3100-3300, सिहोर नं. 1 5000-5200, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी नं.1 3600-3800, नं. 2 3100-3300 मिलबर 2450-2500रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5300-5500, गावरान नं. 2-4700-5000, नं. 3 4300-4500, दूरी 3500-4000 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु. गूळ : गूळ एकस्ट्रा 3750-4000, गूळ नं. 1 3550-3700, गूळ नं. 2 3400-3500, गूळ नं.3 3250-3350, गूळ नं. 4 3100-3200, बॉक्स पॅकिंग 3500-4800 रु. डाळी : तूरडाळ 10000-12000, हरभराडाळ 6000-6200, मूगडाळ 9500-10200, मसूरडाळ 7300-7400, मटकीडाळ 9000-10500, उडीदडाळ 9000-10500 रु. कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा- 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000-8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11100-11500, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु. साबुदाणा : साबुदाणा नं.1 6500, साबुदाणा नं.2 6200, साबुदाणा नं. 3 6000 रु. वरई भगर :11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1200-1400 रु. शेंगदाणा : जाडा 12000-12500, स्पॅनिश – 11600-11800, घुंगरु 11000, टीजे 10700-10800 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल : 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा-3800-4300, दगडी पोहा 3800-4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 650-775, घोटी 450-475, सुरती 475-500 रु. रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1525-1625, रवा 1525-1625, मैदा 1525-1625, बेसन :- (50 किलोस) 3300-3600 रु. मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 260, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु.मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ : (शेकडयाचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1350-1400, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1500-1550., सापसोल 2000-2700 रु.

Back to top button