इंदापूर : ‘हर घर जल’चा इंदापूरसाठी 800 कोटी रुपयांचा निधी | पुढारी

इंदापूर : ‘हर घर जल’चा इंदापूरसाठी 800 कोटी रुपयांचा निधी

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘हर घर जल’ ही योजना ही केंद्र सरकारची असून, इंदापूर तालुक्याला 800 कोटींचा निधी आला असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली रविवारी (दि. 12) इंदापूर येथे राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले,पाच कोटी रुपयांपेक्षा कमी निधीची योजना असेल, तर त्याची अंमलबजावणी ही जिल्हा परिषदेने करायची आहे. मात्र, काहींना असे वाटते की जिल्हा परिषदेतून योजना राबवली म्हणजे आम्हीच केली, पण तुम्ही फक्त पोस्टमन आहात.

तुम्हाला फक्त दिलेले पत्र खाली पोहोच करायचे आहे, तुम्ही मालक नाहीत. मनीऑर्डर देणारे केंद्र आणि राज्य आहे. याचाच फायदा घेत काही लोक गावोगावी आम्ही योजना आणली म्हणून उद्घाटने करत फिरतायेत अशी टीका आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता पाटील यांनी केली. लाकडी निंबोडी योजनेची परवानगी सन 2012 ची आहे.

विरोधक त्याबाबत दिशाभूल करत असून, राज्य अर्थसंकल्पामध्ये 350 कोटी रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतरच त्या कामाची निवेदन निघाली आहे, ही योजना लवकरच सुरू होणार असून, ज्या शेतकर्‍यांना खरेच पाणी मिळत नाही अशा शेतकर्‍यांना मिळणार आहे. इंदापूर तालुक्यातील पिंपळे आणि अकोले ही दोन गावे त्यातून काहींनी वगळून बारामतीतील बागायती गावे यामध्ये घेतली आहेत. त्याचीदेखील सुधारित योजना केली जाणार आहे.

Back to top button