पलूस : बुर्ली येथील शेतकर्‍याची 23 लाखांची फसवणूक | पुढारी

पलूस : बुर्ली येथील शेतकर्‍याची 23 लाखांची फसवणूक

पलूस; पुढारी वृत्तसेवा : ऊस गळीत हंगामासाठी तोडणी मजूर पुरवठा करतो म्हणून बुर्ली (ता. पलूस) येथील वाहन मालकांची कर्नाटक येथील दोन मुकादमांनी 23 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत बुर्ली येथील संतोष दीपक चौगुले (वय 22) व सतीश जंबू चौगुले (वय 46) यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ऊस तोडणी मजुरांच्या 13 जोड्या देतो म्हणून सुरेश गंगाराम वजंत्री ( रा. टाकळी, ता.इंडी, जि. विजापूर, कर्नाटक ) या मुकादमाने बुर्ली येथील सतीश चौगुले यांच्याकडून रोख, आरटीजीएस, एनएफटीद्वारे नोटरी करार करून दि. 22 जुलै 2022 ते दि. 27 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत 13 लाख 20 हजार रुपये घेतले. मात्र, मजूर पुरवले नाहीत. तसेच ऊस तोडणी मजुरांच्या 10 जोड्या पुरवतो म्हणून रावसाहेब शांताप्पा इरसूर (रा. टाकळी, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) यांनी दि. 19 जुलै 2022 ते दि. 27 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत वेळोवेळी 10 लाख रुपये घेतले. मात्र, मजूर न पुरवता फसवणूक केली. याबाबत त्यांनीही पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Back to top button