Twitter : आता ट्विट १० हजार अक्षरांपर्यंत करता येणार; एलन मस्क यांची घोषणा | पुढारी

Twitter : आता ट्विट १० हजार अक्षरांपर्यंत करता येणार; एलन मस्क यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरचे (Twitter)  सीईओ एलन मस्क सतत नवनवीन घोषणा करून युजर्संना आश्चर्याचा धक्का देत असतात. आता त्यांनी आपल्या ट्विटद्वारे अशीच एक घोषणा केली आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म लवकरच लाँगफॉर्म ट्विट 10 हजार अक्षरांपर्यंत करता येणार आहे, अशी माहिती एलन मस्क यांनी आज (दि.६) दिली आहे.

एलन मस्क यांनी सांगितले की, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म (Twitter) नवीन वैशिष्ट्यांचा समूह आणण्यासाठी कंपनी अपडेटवर काम करत आहे. यामुळे युजर्संना वैयक्तिक थेट संदेशांना (डीएम) प्रतिसाद देण्यास कोणतीही इमोजी आणि एन्क्रिप्शन वापरण्यास मुभा असेल.

दरम्यान, यूएसमधील ब्लू सदस्य प्लॅटफॉर्मवर 4 हजार अक्षरांपर्यंत पर्यंतचे ट्विट पोस्ट करू शकतात, असे कंपनीने मागील महिन्यात जाहीर केले होते. याआधी ट्विट केवळ 280 अक्षरापर्यंत मर्यादित होते. ते सदस्य नसलेल्यांनाही लागू होते. दरम्यान, केवळ ब्लू सदस्यच लांब ट्विट पोस्ट करू शकतात. परंतु सदस्य नसलेले ते वाचू शकतात, प्रत्युत्तर देऊ शकतात, रीट्विट करू शकतात आणि कोट करू शकतात.

मस्क यांच्या पोस्टवर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावर त्यांनी मत व्यक्त करत काहींनी यावर आनंद व्यक्त केला आहे. तर काही जणांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजर्सने, तुम्ही एक वेडा माणूस आहात, असे म्हटले आहे. तर दुसर्‍याने टिप्पणी करताना !! व्वा! ही खरोखर चांगली बातमी आहे. मायक्रोब्लॉगिंग!” असे म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button