ग्रीन ग्रोथ- १५ वर्षांहून जुनी ३ लाख वाहने स्क्रॅप होणार, पीएम मोदी यांची माहिती | पुढारी

ग्रीन ग्रोथ- १५ वर्षांहून जुनी ३ लाख वाहने स्क्रॅप होणार, पीएम मोदी यांची माहिती

पुढारी ऑनलाईन : या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रीन ग्रोथसंदर्भात जी तरतूद करण्यात आली आहेत, ती एक प्रकारे आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची पायाभरणी आहे. 2014 पासूनच भारत हरित क्षमता जोडण्यात सर्वात वेगवान काम करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात जगाच्या ग्रीन इंडस्ट्रीत भारत महत्त्वाचा भाग बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी व्यक्त केला आहे. ग्रीन ग्रोथवरील पहिल्या पोस्ट-बजेट वेबिनारमध्ये ते बोलत होते.

भारताचे वाहन स्क्रॅपिंग धोरण हा भारताच्या हरित विकास धोरणाचा प्रमुख भाग आहे. येत्या काही महिन्यांत १५ वर्षांहून जुनी सुमारे ३ लाख वाहने स्क्रॅप केली जाणार आहोत. अर्थसंकल्पीय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण एकत्रितपणे आणि झपाट्याने काम करणे आवश्यक असल्याचे पीएम मोदी यांनी म्हटले. हरित ऊर्जेशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये भारत जगात आघाडी घेऊ शकतो.

यावेळी बोलताना ते म्हणाले, हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणासाठी भारताने तीन टप्पे नियोजित केले आहेत. यामध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जा उत्पादन वाढवणे, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि गॅस-आधारित अर्थव्यवस्थेसह पुढे जाणे उद्दिष्टांचा समावेश आहे. सरकारने ग्रीन ग्रोथच्या दिशेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. ज्यात इथेनॉल मिश्रण, पीएम कुसुम योजना, सौर उत्पादनास प्रोत्साहन देणे, छतावर सौर योजना, कोळसा गॅसिफिकेशन, ईव्ही बॅटरी स्टोरेज यांचा समावेश आहे, असे देखील पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

मी ऊर्जा जगताशी संबंधित सर्व भागधारकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Back to top button