Raj Kapoor : आर. के. स्टुडिओनंतर राज कपूर यांचा बंगला विकला | पुढारी

Raj Kapoor : आर. के. स्टुडिओनंतर राज कपूर यांचा बंगला विकला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर (Raj Kapoor) यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला विकला गेला आहे. हा बंगला गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीने खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी किती कोटींची डिल झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, कंपनीशी १०० कोटींचे डिल झाल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही वर्षापूर्वी आर. के. स्टुडिओ विकल्यानंतर आता राज कपूर (Raj Kapoor) यांचा बंगला विकला गेल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. याच दरम्यान दिवंगत राज कपूर यांचे वारस असलेल्या कपूर कुटुंबाकडून हा बंगला खरेदी करण्यात आल्याची माहिती गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीने दिली आहे. परंतु, हा बंगला किती कोटींना खरेदी केला आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर या बंगल्याचे डील १०० कोटींत झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबईतील चेंबूरमध्ये देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या बाजूला राज कपूर यांचा बंगला आहे. याच बंगल्याची विक्री झाली आहे. बंगल्याच्याआधी मे २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने आरके स्टुडिओ खरेदी केला होता. यानंतर हा बंगला विकल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

हेही वाचा : 

Back to top button