Pulwama Attack Tribute : पुलवामा हल्ल्यातील शहीदांना वीरेंद्र सेहवागची अनोखी श्रद्धांजली | पुढारी

Pulwama Attack Tribute : पुलवामा हल्ल्यातील शहीदांना वीरेंद्र सेहवागची अनोखी श्रद्धांजली

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला मंगळवार (१४ फेब्रुवारी)  चार वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यातील शहीद जवानांना वेगवेगळ्या स्वरुपात श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही  पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील जवानांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. याची चर्चा सोशल मीडियासह सर्वत्र होत आहे. त्याच्या या कृतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Pulwama Attack Tribute)

Pulwama Attack Tribute : शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण

वीरेंद्र सेहवागने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या दोन शूर जवानांच्या मुलांना दत्तक घेतले आहे. सेहवाग या मुलांना त्याच्या शाळेत मोफत शिकवत आहे. एवढेच नाही तर सेहवाग मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षणही देत ​​आहे. वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्याने लिहिलं आहे की, ‘या फोटोंमधील पहिला फोटो फलंदाजी करत असलेल्या अर्पित सिंहचा आहे. अर्पित हा पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवान राम वकील यांचा मुलगा आहे. दुसरीकडे, दुसऱ्या छायाचित्रात राहुल सोरेंग आहे जो पुलवामामध्ये शहीद झालेल्या विजय सोरेंग यांचा मुलगा आहे.” वीरेंद्र सेहवाग या दोन्ही मुलांना मोफत शिकवत आहे. विशेष म्हणजे शहिद जवानांच्या सुपुत्रांनाही आपल्या वडिलांप्रमाणे सैन्यात जाऊन देशसेवा करायची आहे. वीरेंद्र सेहवागच्या या कामाचे देशभरातील लोक कौतुक करत आहेत.

भाग्याची गोष्ट

दोन्ही मुलांचा फोटो शेअर करत वीरेंद्र सेहवागने लिहिले की, ‘ही दोन मुलं सेहवागच्या शाळेत (Sehwag International School) शिकत आहेत, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.’ दोन्ही मुलं अभ्यासासोबतच क्रिकेट खेळायलाही शिकत आहेत.” त्याचा संपूर्ण खर्च वीरेंद्र सेहवाग करत आहे.

पुलवामा हल्ला

१४ फेब्रवारी २०१९ रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात CRPF चे ४०  जवान दहशतवादी हल्‍ल्‍यात शहीद झाले होते.  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जवानांनी भरलेल्या बसच्या ताफ्यावर धडक दिली. त्यामुळे बसचा स्फोट झाला. या भ्याड हल्यानंतर भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले करत चोख प्रत्‍युत्तर दिले होते.

हेही वाचा 

Back to top button