Greenfield Airport : चार वर्षात ९ ग्रीनफिल्ड विमानतळ कार्यान्वित; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती | पुढारी

Greenfield Airport : चार वर्षात ९ ग्रीनफिल्ड विमानतळ कार्यान्वित; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार वर्षांच्या कालावधीत देशात 9 ग्रीनफिल्ड विमानतळ कार्यानि्व त झाले असल्याची माहिती हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी गुरुवारी लोकसभेत लेखी उत्तरादाखल दिली. वर्ष 2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या ग्रीनफिल्ड विमानतळ धोरणानुसार देशाच्या विविध भागात विमानतळांची उभारणी केली जात असल्याचेही सिंग यांनी नमूद केले.

गेल्या चार वर्षात जी विमानतळे कार्यानि्वत झाली आहेत, त्यात 520 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग, 176 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या कलबुर्गी, 187 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या कुर्नूलजवळील ओर्वाकल, 646 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या इटानगर, 448 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या कुशीनगर तसेच 2 हजार 870 कोटी रुपये उभारण्यात आलेल्या मोपा विमानतळाचा समावेश आहे.

Back to top button