महिला टी-20 ‘वर्ल्डकप’मधून पुरुष सामनाधिकारी-पंचांची गच्छंती! | पुढारी

महिला टी-20 'वर्ल्डकप'मधून पुरुष सामनाधिकारी-पंचांची गच्छंती!

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेत 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आयसीसी जागतिक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच या विश्वचषक स्पर्धेतील सर्व मॅच अधिकारी महिला असतील. आयसीसीने शुक्रवारी (27 जानेवारी) याची घोषणा केली.

या विश्वचषकासाठी आयसीसीने 3 सामनाधिकारी आणि 10 पंचांची नावे जाहीर केली असून यात भारतीय महिलांचा दबदबा दिसून योतो आहे. तीन मॅच रेफरींपैकी एक जीएस लक्ष्मी आहेत. तर दहा पंचांच्या यादीत वृंदा राठी आणि एन जननी या भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 12 फेब्रुवारीला केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 26 फेब्रुवारीला होणार आहे.

ICC महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महिला सामनाधिकारी आणि पंचांची यादी

सामनाधिकारी : जीएस लक्ष्मी (भारत), शांद्रे फ्रिट्झ (द. आफ्रिका), मिचेल परेरा (श्रीलंका)

पंच : स्यू रेडफर्न (इंग्लंड), एलॉइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया), क्लेयर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया), जॅकलीन विल्यम्स (वेस्टइंडीज), किम कॉटन (न्यूजीलंड), लॉरेन एजेनबाग (द. आफ्रिका), ॲना हॅरिस (इंग्लंड), वृंदा राठी (भारत), एन जननी (भारत), निमाली परेरा (श्रीलंका)

Back to top button