Gujarat Court : गुजरात न्यायालय म्हणते, ‘गो हत्या’ थांबवल्या तर जलवायू परिवर्तनाची समस्या सुटेल! | पुढारी

Gujarat Court : गुजरात न्यायालय म्हणते, 'गो हत्या' थांबवल्या तर जलवायू परिवर्तनाची समस्या सुटेल!

पुढारी ऑनलाइन डेस्क : सध्या जगात जलवायू परिवर्तनासह अनेक गंभीर समस्या आहे. या सर्व समस्या गो हत्या थांबविली तर सहट सुटतील, अशी टिप्पणी गुजरातच्या एका न्यायालयाने केली आहे. एका व्यक्तीला अवैधपणे गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावताना न्यायालयाने, असे अजब मत व्यक्त केले आहे. Gujarat Court

यासंबंधी लाइव लॉ या वेबसाइटने तापी जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांच्या टिप्पणीचा हवाला देत यासंबंधीचे वृत्त दिले आहे. वृत्तात म्हटले आहे की न्यायाधीश समीर विनोद चंद्र व्यास यांनी म्हटले आहे की, गायीच्या शेणापासून बनवलेल्या घरांवर अॅटोमिक रेडिएशनचा देखील परिणाम होत नाही. तसेच गायीच्या गोमूत्राने अनेक आजारांवर उत्तम उपचार होतात. या औषधांना काही वैज्ञानिक आधार नाही, असे ही न्यायाधीशांनी म्हटले आहे. Gujarat Court

बार आणि बेंचच्या रिपोर्टनुसार, गौ रक्षाने संबंधित सर्व गोष्टींना व्यवहारात आणलेले नाही. अशी मान्यता आहे की गाय फक्त एक जनावर नसून ती आई आहे. एका गायीमध्ये 68 कोटी तीर्थ स्थल आणि 33 कोटी देवी-देवतांचा वास असतो. न्यायालयाने वेगवेगळ्या श्लोकांचे उदाहरण देऊन गायीला कष्ट आणि दुःख पोहोचवल्यास तुमच्या धन-संपत्तीवर वाईट प्रभाव पडतो. Gujarat Court

इतकेच नव्हे तर न्यायाधीशांनी जलवायू परिवर्तनाचा संबंध देखील गो हत्येशी जोडला आहे. न्यायाधीश म्हटले, आज लोकांचे स्वभाव चिडचिडे आणि गरम झाले आहे. त्याचे मुख्य कारण गो हत्या आहे. जो पर्यंत गो हत्येवर पूर्णपणे प्रतिबंध लावले जात नाही. तो पर्यंत सात्विक जलवायू परिवर्तनचा कोणताही परिणाम दिसणार नाही. Gujarat Court

हे ही वाचा :

Stock Market Today | मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४५० अंकांनी वधारून ६१ हजारांवर

INS Vagir : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; कलवारी श्रेणीची पाणबुडी INS वागीर नौदलात सामील होणार

Back to top button