Stock Market Today | मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४५० अंकांनी वधारून ६१ हजारांवर | पुढारी

Stock Market Today | मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४५० अंकांनी वधारून ६१ हजारांवर

Stock Market Today : मजबूत जागतिक संकेतांमुळे आज सोमवारी (दि. २३)  शेअर बाजारात तेजी आली. सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४६२ अंकांनी वाढून ६१ हजारांवर पोहोचला तर निफ्टी १८,१०० वर गेला. टाटा मोटर्स, हिंदाल्को, इंडसइंड बँक, एसबीआय लाइफ आणि कोटक बँक हे निफ्टीवर टॉप गेनर्स होते. तर डॉ. रेड्डी, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्स घसरले होते.

काही बँकांनी तिमाही अहवालातून त्यांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे दर्शवले आहे. तसेच अमेरिकेच्या शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत सोमवारी भारतीय बाजारातील शेअर्स ‍वधारले. आठवड्याच्या अखेरीस तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्यानी वाढले.

शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाले होते. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज ३३० अंकांनी वाढून ३३,३७५ वर स्थिरावला होता. तर S&P 500 हा १.८९ टक्के वाढून ३,९७२ वर आणि टेक-हेविवेट निर्देशांक नॅस्डॅक २८८ अंकांनी वाढून बंद झाला होता. आज सोमवारी आशियातील बहुतांश बाजार बंद असतात. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक सोमवारी ३०४ म्हणजेच १.१५ टक्के वाढून २६,८५७ वर व्यवहार करत होता. (Stock Market Today)

हे ही वाचा :

Back to top button