खोर : भीमा-पाटस कारखान्याचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा | पुढारी

खोर : भीमा-पाटस कारखान्याचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा

खोर(ता. दौंड ); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भीमा-पाटस साखर कारखान्याने उसाच्या बिलाचा पहिला हप्ता शेतकरीवर्गाच्या खात्यावर जमा केल्याची माहिती आमदार व भीमा-पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी दिली. याबाबत माहिती देताना आमदार राहुल कुल म्हणाले की, पहिल्या पंधरवड्याचे बिल शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहे.

कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या 35 हजार टनांचे 2 हजार 500 रुपये प्रतिटनाप्रमाणे पाहिल्या हप्त्याचे 9 कोटी रुपये संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत तसेच ऊसतोडणी वाहतुकीचे बिलही प्रत्येकी 10 दिवसांनंतर अदा करण्यात आलेले आहे. कारखान्याने दि. 5 जानेवारीअखेर 55 हजार टनांचे गाळप केले असून, शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष व आमदार कुल यांनी केले आहे.

Back to top button