नाशिकची प्रेरणा बॅडमिंटनमध्ये करणार राज्याचे प्रतिनिधीत्व | पुढारी

नाशिकची प्रेरणा बॅडमिंटनमध्ये करणार राज्याचे प्रतिनिधीत्व

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा पाटील हिची बॅडमिन्टन मध्ये विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे. प्रेरणा पाटील ही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार असून सदर स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे २० ते २३ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. या संघाची निवड महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालय क्रीडा स्पर्धामधून करण्यात आली असून या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या १० जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयांचा समावेश होता. या यशाबद्दल मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले, सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, संचालक ॲड लक्ष्मण लांडगे, शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे, प्राचार्य डॉ आय बी चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

Back to top button