सरकारच्या कार्यकाळात पासपोर्ट सेवेत ५०० टक्क्यांनी सुधारणा : व्ही. मुरलीधरन | पुढारी

सरकारच्या कार्यकाळात पासपोर्ट सेवेत ५०० टक्क्यांनी सुधारणा : व्ही. मुरलीधरन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात पासपोर्ट सेवेमध्ये ५०० टक्क्यांनी सुधारणा झाली असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी शुक्रवारी दिली. पूर्वीच्या तुलनेत सध्या पासपोर्ट जारी करण्याचा वेग कितीतरी जास्त वाढला आहे, असेही मुरलीधरन यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

जगाच्या विविध भागात ३.२ कोटी भारतीय अथवा अनिवासी भारतीय नागरिक राहत असल्याचे सांगून व्ही. मुरलीधरन पुढे म्हणाले की, गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत पासपोर्ट सेवेत चांगली सुधारणा झाली आहे. किंबहुना ही सुधारणा ५०० टक्क्यांनी जास्त चांगली आहे. वर्ष २०१४ पूर्वी देशात पासपोर्ट काढण्यासाठीची ११० कार्यालये होती. सध्या ही संख्या ५५० इतकी आहे. पासपोर्ट जारी करण्याचा वेगदेखील वाढला आहे.

वर्षातील काही ठराविक वेळी पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. अशावेळी पासपोर्ट जारी करण्यासाठी पासपोर्ट मेळ्याचे आयोजन केले जाते. गेल्या जून महिन्यापासून अशा २३४ मेळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. येत्या काही दिवसांत ५०० पासपोर्ट मेळ्यांचे आयोजन केले जाणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button