कॉलेजियम बैठकीचा तपशील देण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली | पुढारी

कॉलेजियम बैठकीचा तपशील देण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : वर्ष 2018 मध्ये झालेल्या एका कॉलेजियम बैठकीचा अजेंडा आणि निर्णयाचा तपशील देण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.९) फेटाळून लावली. आरटीआय कायद्याद्वारे अंजली भारद्वाज यांनी ही माहिती मागविली होती. मात्र, हा विषय आरटीआयच्या अखत्यारित येत नाही, असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली.

कॉलेजियम बैठकीतील चर्चा जनतेसमोर आणली जाऊ शकत नाही. केवळ कॉलेजियम बैठकीचा अंतिम निर्णय वेबसाईटवर अपलोड करण्याची गरज असते, अशी टिप्पणी न्यायालयाने निकालात केली. 2018 साली झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीत उच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायमूर्तींच्या पदोन्नतीची शिफारस करण्यात आली होती. या बैठकीचा सविस्तर तपशील दिला जावा, असे अंजली भारद्वाज यांनी आरटीआय अर्जात म्हटले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button