IND VS BAN 2nd ODI : जखमी रोहित शर्माची झुंज अपयशी; बांगलादेशचा भारतावर ५ धावांनी विजय | पुढारी

IND VS BAN 2nd ODI : जखमी रोहित शर्माची झुंज अपयशी; बांगलादेशचा भारतावर ५ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध बांगलादेश दरम्यान सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारताचा ५ धावांनी पराभव केला. भारताचा पराभव करत बांगलादेशने मालिकाही आपल्या नावावर केली आहे. जखमी झालेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. मात्र, त्याची झुंज अपयशी ठरली आहे. मेहंदी हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने हा विजय मिळवला. महेंदी हसनने नाबाद शतक आणि त्याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने हा विजय मिळवला. शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर एकदिवसीय मालिकेतील हा दुसरा सामना खेळवण्यात आला होता. (IND VS BAN 2nd ODI)

बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मेहंदी हसन ८३ चेंडूमध्ये १०० धावा (नाबाद) आणि मोहम्मदुल्लाने केलेल्या ९६ चेंडूमध्ये ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने २७१ धावा केल्या आणि भारतासमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर ३७ धावा देत ३ विकेट्स पटकावल्या. (IND VS BAN 2nd ODI) तर मोहम्मद सिराज आणि उमरान मलिकने प्रत्येकी २ बळी घेतले.

बांगलादेशच्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २६६ धावा करू शकला. भारताला सुरूवातीचे झटके बसल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला. श्रेयस अय्यरने १०२ चेंडूमध्ये ८२ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेल ५६ चेंडूमध्ये ५६ धावा करत अर्धशतक झळकावले. भारतीय कर्णधार सामन्यादरम्यान जखमी झाल्याने सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. रोहित शर्मा जखमी झाल्याने १० व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने २८ चेंडूमध्ये ५१ धावा करत शेवटपर्यंत झुंज दिली. (IND VS BAN 2nd ODI)

हेही वाचंलत का?

Back to top button