Tweet Sanjay Raut : मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? राऊतांचा शंभूराज देसाईंना सवाल | पुढारी

Tweet Sanjay Raut : मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? राऊतांचा शंभूराज देसाईंना सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : “मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील. हाच अर्थ”. असं ट्विट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Tweet Sanjay Raut) यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना सवाल केला आहे.

तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये

कर्नाटक-महाराष्‍ट्र सीमाप्रश्नावरून महाराष्‍ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. त्‍यातच आज शिवसेना खासदार संजय राऊत  शिंदे-फडणवीस सरकारवर कडाटून टीकास्‍त्र सोडत आहेत. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे.” असं खोचक ट्विट त्‍यांनी आज सकाळी केलं होतं.

शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांना कडाडून पलटवार केला. संजय राऊत यांना सीमाप्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊत यांनी अशी वादग्रस्‍त वक्‍तव्ये थांबवावीत अन्यथा आम्‍ही त्‍यांना जशास तसे उत्‍तर देऊ असा पलटवार केला. त्यांनी पुढे असेही म्हणाले की, “आताच कुठे तुम्ही साडेतीन महिने आराम करुन तुरुगांबाहेर आलात. तुम्ही तुरुंगाबाहेर येताच बाहेरचं वातावरण तुम्हाला मानवणार नाही, असं वाटत आहे. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये, अशा शब्दांत शंभूराज देसाई यांनी राऊत यांना इशारा देत प्रत्युत्तर दिलं होत.”

Tweet Sanjay Raut : मी तयार आहे.!! 

आता शंभुराज देसाई यांना सवाल करत ट्विट केलं आहे की,  “मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील. हाच अर्थ”.

आणखी एक ट्विट राऊत यांनी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटलं आहे की,” शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटक आव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा, कायदा, न्यायालये, तपास यंत्रणा खिशात आहेत. असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का? मी तयार आहे.!! असं लिहित इशारा दिला आहे.

 

हेही वाचा

Back to top button