कोल्हापूर : सरपंचपदासाठी 283 तर सदस्यपदासाठी 1,824 अर्ज | पुढारी

कोल्हापूर : सरपंचपदासाठी 283 तर सदस्यपदासाठी 1,824 अर्ज

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (दि. 2) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातून सरपंचपदासाठी बुधवारी 283, तर सदस्यपदासाठी 1 हजार 824 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर सरपंचपदासाठी 692 उमेदवारांनी 693 अर्ज, तर सदस्यपदासाठी 3 हजार 253 उमेदवारांनी 3 हजार 272 अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दि. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी, बुधवारी गर्दी झाली होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ उमेदवार व अनुमोदक, सूचक यांनाच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे महिलांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांचे पती त्यांच्यासोबत सोडण्याचा आग्रह धरत होते. आजअखेर सरपंचपदासाठी सर्वात अधिक 104 उमेदवारी अर्ज राधानगरी तालुक्यातून, तर सदस्यपदासाठी करवीर तालुक्यातून 576 अर्ज दाखल झाले आहेत.

Back to top button