दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : डिएगोचा दणदणीत विजय | पुढारी

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : डिएगोचा दणदणीत विजय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या फुटबॉल क्रीडा स्पर्धेत डिएगो ज्युनियर, गो स्पोर्ट्स, पुणे सॉकर क्लब, क्रीडा प्रबोधिनी, आयफा बेलगावी आणि उत्कर्ष क्रीडा मंच ‘अ’ यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दै. ‘पुढारी’च्या वतीने या स्पर्धा मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या फुटबॉल मैदानावर आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यामध्ये डिएगो ज्युनियर संघाने बिटा स्पोर्टस ‘ब’ संघाचा 8-0 असा एकतर्फी पराभव करीत दणदणीत विजय मिळविला. या सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटांमध्येच दोन गोल करीत संघाने आघाडी मिळवून बिटा संघावर दबाव टाकला. या सामन्यामध्ये देवश्री भक्ता हिने तिसर्‍या मिनिटाला पहिला गोल करीत संघाचे खाते उघडले.

त्यानंतर एवा पिटाले हिने पाचव्या मिनिटाला दुसरा गोल केला. तनिषा अजेरा हिने सहाव्या मिनिटाला तिसरा गोल, तर देवश्री भक्ता हिने आठव्या मिनिटाला चौथा गोल केला. पहिल्या दहा मिनिटांमध्येच डिएगो संघाने 4-0 अशी आघाडी मिळवीत सामन्यावर वर्चस्व मिळविले.
सामन्यामध्ये दिव्या बसंतानी हिने पंधरा मिनिटाला पाचवा गोल केला.

देवश्री भक्ताने 27 व्या मिनिटाला सहावा गोल, भूमिका चौधरी हिने 31 व्या मिनिटाला सातवा गोल, तर दिव्या बसंतानी हिने 40 व्या मिनिटाला आठवा गोल करीत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. दुसर्‍या सामन्यामध्ये गो स्पोर्ट्स संघाने स्टेप ओव्हर फुटबॉल अकादमी संघाचा 2-1 असा पराभव करीत आगेकूच केली. सुरुवातीच्या दहा मिनिटांमध्ये एकाही संघाला गोल नोंदविला आला नाही.

मात्र, गो स्पोर्ट्सच्या पियुषा नरके हिने 15 व्या मिनिटाला पहिला गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर स्टेप ओव्हर संघाकडून रोशनी पंडित हिने 20 व्या मिनिटाला पहिला गोल करीत सामन्यामध्ये बरोबरी साधली. ही बरोबरी सामन्यामध्ये जास्त काळ राहिली नाही. गो स्पोर्ट्सच्या वेदांगी गणले हिने 30 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवीत संघाला विजय मिळवून दिला.

तिसर्‍या सामन्यामध्ये पुणे सॉकर क्लब संघाने केएमपी संघाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. सुरुवातीपासूनच या संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाला सुरुवात केली. सॉकर संघाच्या सेनोरिटा नाँगप्लु आणि ऊर्वी साळुंखे यांनी प्रत्येकी दोन गोलची नोंद केली. या सामन्यात सेनोरिटा हिने 16 व्या मिनिटाला पहिला गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर ऊर्वी साळुंखे हिने 18 व्या मिनिटाला दुसरा, तर 20 व्या मिनिटाला तिसरा गोल करीत सामन्यामध्ये 3-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सेनोरिटा हिने 31 व्या मिनिटाला चौथा गोल, तर पूर्णिमा गेहलोत हिने 40 व्या मिनिटाला पाचवा गोल करीत संघाला विजय मिळवून दिला.

चौथ्या सामन्यामध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाने स. प. महाविद्यालयाचा 9-0 असा एकतर्फी दणदणीत पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यामध्ये श्रृती मेके हिने सहाव्या मिनिटाला पहिला गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर पूर्वा गायकवाड हिने 12 व्या मिनिटाला, तर आदिती गाडेकर हिने 31 व्या मिनिटाला तिसरा गोल करीत संघाला 3-0 ची आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर ऐश्वर्या भोंडे हिने 34 व्या मिनिटाला चौथा गोल, प्रेरणा मेश्राम हिने 40 व्या आणि 41 व्या मिनिटाला सलग दोन गोल करीत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दिव्या पवारने 46 व्या मिनिटाला सातवा गोल, सुमय्या शेखने 48 व्या मिनिटाला आठवा गोल, तर प्रेरणा मेश्राम हिने 49 व्या मिनिटाला नववा गोल करीत संघाला विजय मिळवून दिला.

पाचव्या सामन्यामध्ये आयफा बेलगावी संघाने उत्कर्ष क्रीडा मंच ब संघाचा 6-0 असा पराभव केला. त्यामध्ये अंजली एच हिने आठव्या मिनिटाला पहिला गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर तन्वी जी हिने 21 व्या मिनिटाला दुसरा गोल, आदिती जे हिने 32 व्या मिनिटाला तिसरा गोल, तर एकता पी हिने 39 व्या मिनिटाला चौथा गोल केला. त्यानंतर सामन्यामध्ये तन्वी जी हिने 46 व्या मिनिटाला पाचवा गोल, तर साक्षी के हिने

49 व्या मिनिटाला सहावा गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. सहाव्या सामन्यामध्ये उत्कर्ष क्रीडा मंच अ संघाने कमांडोज संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करीत दणदणीत विजय मिळवून दिला. या सामन्यामध्ये आनंदी खोळपकर हिने 14 व्या मिनिटाला पहिला गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर टिंबरन शेरला हिने 18 व्या मिनिटाला दुसरा गोल, तर श्वेता मालनगावे हिने 30 व्या मिनिटाला तिसरा गोल करीत संघाला विजय मिळवून दिला.

दै. ‘पुढारी’ ने आयोजित केलेल्या ‘राईज अप’ महिला क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मुली आणि महिलांना अनेक खेळांची व्यासपीठ उपलब्ध होतील. या स्पर्धांच्या माध्यमातून निश्चितच चांगले खेळाडू तयार होतील आणि भविष्यात त्या आपल्या देशाचे नावही उंचावतील. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सशक्त बनविण्यासाठी अशा पध्दतीच्या स्पर्धांचे आयोजन निश्चितपणे झाले पाहिजे. बालन ग्रुप नेहमीच अशा महिला सबलीकरणाच्या उपक्रमांना पाठबळ देत आला आहे आणि याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.
                                                                    – पुनीत बालन,
                                                          युवा अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हे खरोखरंच उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे. मुळात महिला खेळाडूंसाठी अशी अनोखी क्रीडा विजेतेपदाची स्पर्धा भरविण्याचा विचार हाही तितकाच कौतुकास्पदच म्हणावा लागेल. या उपक्रमात सहभागी होत असल्याबद्दल दिविसा हर्बलला अभिमान वाटतो. या स्पर्धेतील सहभागी खेळाडू आणि दै. ‘पुढारी’ चे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

                                                             – डॉ. संजीव जुनेजा,
                                                       संस्थापक, दिविसा हर्बल प्रा.लि.

दै. ‘पुढारी’ ने राईज अप महिला क्रीडा स्पर्धा भरवून एका चांगल्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली आहे. यातून नक्कीच चांगले महिला खेळाडू देशाला मिळतील. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. नेहमीच अशा उपक्रमांच्या पाठीशी राहिली आहे.

                                                 – सुशील जाधव, झोनल मॅनेजर,
                                           लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसा. लि.

‘राईज अप’ यासारखी महिला क्रीडा स्पर्धा भरवून दै. ‘पुढारी’ने असंख्य महिला आणि मुलींना चांगली संधी दिली आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळेच आज मुली क्रीडा क्षेत्रात नाव उज्ज्वल करत आहेत. सूर्यदत्त इन्स्टिट्यूटकडून ‘पुढारी’च्या उपक्रमास शुभेच्छा.

                                                    – डॉ. संजय चोरडिया,
                             संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन

 

Back to top button