राऊत यांना जामीन : ‘ईडी’च्‍या अर्जावर आज दुपारी ३ वाजता उच्‍च न्‍यायालयात सुनावणी   | पुढारी

राऊत यांना जामीन : 'ईडी'च्‍या अर्जावर आज दुपारी ३ वाजता उच्‍च न्‍यायालयात सुनावणी  

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मनी लाँड्रिंग प्रकरणात आज विशेष पीएमएलए न्यायालयाने राज्यसभा खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्‍यान, या निर्णयाला ‘ईडी’या उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, यावर आज दुपारी तीन वाजता सुनावणी हाेणार आहे.  Patra Chawl land scam

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव येथील  पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) रवानगी करण्यात आली होती. गेले १०० दिवस ते आर्थर रोड कारागृहात आहेत.  ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सहभाग असल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या वकिलांनी पत्राचाळ घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नाही नसल्याचा युक्तीवाद केला.  संजय राऊत यांच्‍या जामीन अर्जावर आज सत्र  न्‍यायालयात सुनावणी झाली. न्‍यायालयाने त्‍यांना जामीन मंजूर केला. 

 Patra Chawl land scam : काय आहे ‘ईडी’चा आरोप

ईडीने (ED- Enforcement Directorate) संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी  गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. ईडीचा राऊत यांच्यावर असा आरोप आहे की,  संजय राऊतांचे भाऊ प्रवीण राऊत (Pravin Raut) हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते. तेव्हा प्रवीण यांना एचडीआयएल ग्रुपकडून (HDIL) ११२ कोटी रुपये मिळाले होते. या ११२ कोटी मधील १ कोटी ६ लाख रुपये हे राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आले. या पैशांनी त्यांनी अलिबाग येथे जमीन खरेदी केली. त्याचबरोबर पत्राचाळ डेव्हलेपमेंटमध्ये प्रवीण राऊत हे फक्त नाममात्र होते; पण सर्व व्‍यवहार संजय राऊत पाहत होते, असेही ईडीने म्हटले आहे. ( Patra Chawl land scam case)

Back to top button