शिंदे गटाचे आमदार पुन्हा गुवाहाटीला जाणार?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही जणार आहेत. अर्थात, यात आधीसारख्या राजकीय घडामोडी होणार नसून कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हा दौरा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दौर्याची तारीख अद्याप निश्चित नाही. तथापि पुढच्या आठवड्यात हा दौरा अपेक्षित आहे. दौर्याची तयारी करण्यासाठी काही पदाधिकारी गुवाहाटीला रवानाही झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आसामचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलिस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींचीही भेट घेणार आहेत.