Tarapur Midc fire : तारापूर एमआयडीसीतील रंग रसायन कंपनीला आग | पुढारी

Tarapur Midc fire : तारापूर एमआयडीसीतील रंग रसायन कंपनीला आग

बोईसर ; पुढारी वृत्तसेवा : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रंग रसायन नामक कारखान्यात शनिवारी रात्री दोनच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली होती. दरम्यान कारखाना बंद असल्याची माहिती समोर येत आहे. (Tarapur Midc fire)

अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. काही तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक एल 9/4 मधील रंग रसायन या कारखान्यात शनिवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास स्फोट झाला होता. स्फोटानंतर कारखान्याला आग लागली होती. (Tarapur Midc fire)

रंग तयार करणाऱ्या कारखाना असल्याने ज्वलनशील द्रव्यांच्या साठ्यामुळे आगीने रौद्र स्वरूप धारण केले होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग तात्काळ आटोक्यात आणली.

यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा तारापूरचा भोपाळ होण्यास वेळ लागला नसता, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते.  तातडीने एमआयडीसीच्या अग्निशमक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.

Back to top button