Gehana Vassisth : दिखाना भी नहीं आता छुपाना भी नहीं आता! गहनाच्या न्यूड फोटोनं धुमाकूळ

Gehana Vassisth
Gehana Vassisth
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पॉर्न चित्रपट बनवणे आणि ते प्रसारित केल्या प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vassisth) आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. गहना वशिष्ठ नेहमीच या ना त्या कारणांने चर्चेत असते. पुन्हा एकदा गहना तिच्या टॉपलेस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिने फोटोंसोबत एक नोटदेखील शेअर केली आहे. त्यातून तिने आपण निर्दोष दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

गहनाने (Gehana Vassisth) बोल्ड फोटो शेअर करत म्हटले आहे की हे फोटो शूट करत असताना तेथे सुमारे २० लोक होते. कसलेही लैंगिक शोषण नाही. मी कसलेही ड्रिंक घेतले नव्हते. मी पूर्ण शुद्धीत होते. मी ऑटोमधून सेटवर गेले आणि दुसऱ्या ऑटोमधून सुरक्षित परत आले. मला त्याचे पेमेंटदेखील मिळाले होते. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी १८ वर्षापेक्षा मोठी आहे आणि मी एक कलाकार आहे.

गहनाने आपण निर्दोष असल्याचे सांगत पुढे म्हटले आहे की, दीड वर्षे आणि त्याहून अधिक कालावधीनंतर माझ्या प्रोड्युसरवर कलम ३७०, ३७६ आणि ३५४ अन्वये आरोप लावू नका. माझी ही पोस्ट तुम्हाला अपमानीत करणारी वाटत असेल तर तुम्ही मला ब्लॉक करु शकता. कारण ही माझी वॉल आहे आणि इथे मला जे हवे आहे ते पोस्ट करण्याचा अधिकार आहे.

गहनाच्या या पोस्टवर युजर्स राज कुंद्रा याचे नाव घेऊन कमेंट्स करत आहेत. एका युजरने गहनाच्या फोटोवर कमेंट करत राज कुंद्राचे शुटिंग चालले आहे काय? असा सवाल केला आहे. 'दिखाना भी नहीं आता छुपाना भी नहीं आता!' अशी एक कमेंट एका युजरने केली आहे.

गेल्या फेब्रुवारीत काही मॉडेल्सनी गहना वशिष्ठ आणि अन्य काही जणांवर जबरदस्तीने पॉर्न चित्रपट शूट केल्याचा आरोप केला होता. एका मॉडेल्सने शुटिंग सेटवर तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गहनाला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने राज कुद्राला अटक केली होती. राज कुद्रा सध्या तुरुंगात आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news