Share Market Today | आर्थिक मंदीची धास्ती, सेन्सेक्स, निफ्टी घसरला, डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.०७ ‍वर गडगडला | पुढारी

Share Market Today | आर्थिक मंदीची धास्ती, सेन्सेक्स, निफ्टी घसरला, डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.०७ ‍वर गडगडला

Share Market Today : आर्थिक मंदीच्या शक्यतेने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. यामुळे गुरुवारी आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसून आले. चार सत्रातील तेजीनंतर आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. बाजार खुला होताच सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी घसरुन ५८,९०० वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीही घसरून १७,४०० वर व्यवहार करत आहे. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरला आहे. गुरुवारी रुपया ८३.०७ पर्यंत घसरला. (Share Market Today) बुधवारी सेन्सेक्स १४६ अंकांनी वधारुन ५९,१०७ वर बंद झाला होता. तर निफ्टी २५ अंकांनी वाढून १७,५१२ वर बंद झाला होता.

आशियामधील Hong Kong चा Hang Seng निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात २ टक्क्यांनी घसरला. तर जपानचा Nikkei २२५ निर्देशांक ०.९८ टक्क्याने घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.७८ टक्क्यांनी खाली आला होता.

क्रिप्टोकरन्सीच्या पुन्हा घसरल्या

गुरुवारी सकाळी क्रिप्टोकरन्सीच्या किमती पुन्हा घसरल्या. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप १.१७ टक्क्यांनी घसरले आहे आणि यामुळे जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ९१५.६४ अब्ज डॉलरवर आहे. बिटकॉइन १९,०५७ डॉलरवर व्यवहार करत आहे आणि त्यात १.१४ टक्क्यांनी घसरण दिसून येत आहे. इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्कचे मूळ टोकन १.८० टक्क्यांनी घसरले आहे. BNB ही Binance स्मार्ट चेनची मूळ क्रिप्टोकरन्सी ०.४९ टक्क्यांनी घसरली आहे.

रुपयाची घसरण थांबेना

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच आहे. गुरुवारी रुपया ८३.०७ पर्यंत घसरला. डॉलर मजबूत झाल्याने बुधवारी रुपया ६० पैशांनी घसरून प्रथमच ८३ च्या निचांकी पातळीवर पोहोचला होता. त्यात पुन्हा गुरुवारी घसरण झाली.

हे ही वाचा :

 

Back to top button