नेवासा : जायकवाडीच्या दिशेने झेपावले ‘उजनी’इतके पाणी; यंदा प्रथमच वाहिले इतके पाणी | पुढारी

नेवासा : जायकवाडीच्या दिशेने झेपावले ‘उजनी’इतके पाणी; यंदा प्रथमच वाहिले इतके पाणी

नेवासा; पुढारी वृत्तसेवा: गोदावरी नदीपात्रातून 91 टीएमसी, तर प्रवरानदीपात्रातून 33 टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत वाहिले असून, यामुळे जायकवाडी धरणाच्या क्षमतेपेक्षा ज्यादा पाणी नदी पात्रातून वाहून गेले. दोन्ही नद्यांतून आतापर्यंत 124 टीएमसी, म्हणजेच उजनी धरणा इतकेच पाणी आज अखेरपर्यंत जायकवाडी दिशेने झेपावले आहे, अशी माहिती मुळा पाटबंधार्‍याचे शाखा अभियंता महेश शेळके यांनी दिली आहे.

11 सप्टेंबर अखेर पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार भंडारादरा धरणातून वीज निर्मितीसाठी 814 क्युसेक पाणी सुरू आहे. निळवंडे धरणातून 2875 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ओझरमधून प्रवरा पात्रात सात हजार विसर्ग सुरू आहे.
मुळातून मुळा नदीपात्रात 10 हजार क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर कमलपूर बंधार्‍यातून आज अखेर जायकवाडीच्या दिशेने 88.25 क्युसेक पाणी झेपावले आहे. नेवासा मध्यमेशवर बंधार्‍यातून 29.84 क्युसेक पाणी जायकवाडी दिशेने गेले. त्यामुळे दोन्ही नद्यांतून 118.09 टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने गेले.

यंदा प्रथमच जायकवाडीच्या दिशेने इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी गेले असल्याचे बोलले जात आहे. पाणी वाटप कायद्याच्या कक्षेत आपल्या दोन्ही धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडवा लागत होते. परंंतु, यंदा प्रथमच 118 टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहून गेल्यामुळे भविष्यात पाणी प्रश्नाची आवश्यक भसणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आपल्या धरणातील पाणी आपल्याला हक्काने मिळणार असल्यामुळे शेतकर्‍यांना यंदा मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रवरा पात्रात सात हजारने विसर्ग
प्रवरा नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने गेलेले 33 टीएमसी पाणी, तर गोदावरी नदी पात्रातून गेलेले 91 टीएमसी पाणी म्हणजे जायकवाडी दिशेने दोन्ही नद्यांतून जवळपास 124 टीएमसी पाण्याचा विसर्ग झालेला आहे. भंडारादरा धरणातून वीज निर्मितीसाठी 814 क्युसेक पाणी सुरू आहे. निळवंडे धरणातून 2875 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर ओझरमधून प्रवरा पात्रात सात हजारने विसर्ग सुरू आहे.

Back to top button