भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली अमित शहा, नड्डांची भेट | पुढारी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली अमित शहा, नड्डांची भेट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि.२४) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन सचिव बी. एल. संतोष यांची सदिच्छा भेट घेतली. पक्षांची संघटनात्मक बांधणी तसेच अन्य विषयांवर अमित शहा यांनी यावेळी बावनकुळे यांना मार्गदर्शन केले.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बावनकुळे यांनी शहा, नड्डा यांची घेतलेली ही पहिली भेट होती. दोन्ही बैठकांत राज्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचेही समजते. दरम्यान, बावनकुळे यांनी व्यापार मंत्री पियूष गोयल, कामगार मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचीही भेट घेत त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button