Ayushman Bharat card : आयुष्यमान कार्डसाठीची पात्रता आणि नोंदणीविषयी जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

Ayushman Bharat card : आयुष्यमान कार्डसाठीची पात्रता आणि नोंदणीविषयी जाणून घ्‍या सविस्‍तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्र व राज्‍य सरकार लोकहितार्थ विविध योजना राबवत असते. सरकारी योजनांचा मुख्‍य उद्देश हा उत्‍पन्‍न कमी असणार्‍या नागरिकांना लाभ पोहचविणे हा असतो. देशात आरोग्‍य, रोजगार, शिक्षण, स्‍वस्‍त धान्‍य, निवृत्ती वेतन, विमा अशा विविध योजनांची अंमलबजावणी होते. यातील आयुष्यमान भारत ही एक योजना आहे. (  Ayushman Bharat card ) या योजनेस पात्र ठरणार्‍या नागरिकांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार होतात. जाणून घेवूया या योजनेसाठीची पात्रता आणि कार्ड मिळण्‍याच्‍या प्रक्रियेविषयी…

आयुष्‍यमान भारत ही एक आरोग्‍यासाठीची योजना आहे. या योजनते पात्र ठरणार्‍या नागरिकांना एक कार्ड दिले जाते. या कार्डच्‍या आधारे सरकारने जाहीर केलेल्‍या यादीतील हॉस्‍पिटलमध्‍ये ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होतात.

काय आहेत योजनेस पात्र ठरण्‍याच्‍या अटी…

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अटी : संबंधित कुटुंबाचे पक्‍के घर नसावे, कुटुंबातील प्रमुख महिला असावी, एक व्‍यक्‍ती दिव्‍यांग असेल तर, अनुसूचित जाती/जमातीमधील व्‍यक्‍ती, भूमिहिनी व्‍यक्‍ती, बेघर व्‍यक्‍ती, वेठबिगार मजूर, आदिवासी आदी या योजनेसाठी पात्र ठरतात.

शहरी भागातील नागरिकांसाठी अटी : फिरस्‍ते, कचरा वेचक, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरीवाले, रस्‍त्‍यावर काम करणारे, बांधकामांवर काम करणारे मजूर, फ्‍लंबर, मिस्‍त्री, पेंटर, वेल्‍डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सफाई कर्मचारी, मोल मजूरी करणारे, चालक, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे आदी या योजनेस पात्र ठरतात.

 Ayushman Bharat card : कसा कराल अर्ज ?

आयुष्‍यमान कार्डसाठी तुम्‍ही पात्र असाल तर कार्डसाठी तुम्‍ही ऑनलाईन किंवा तुमच्‍याजवळ असणार्‍या जनसेवा केंद्रावर जावून अर्ज सादर करु शकता. हा अर्ज करताना आधार कार्ड, रहिवासी दाखला, रेशन कार्ड आणि कुटुंबातील एकाचा एक मोबाईल फोन नंबर असणे आवश्‍यक आहे.

ग्रामीण भागात अनेकदा मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही. ही शक्यता लक्षात घेता मोबाईलचे नेटवर्क मिळाले नाही तर आधारशीही हेल्थ कार्ड लिंक करता येते. मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर मिळालेला ओटीपी क्रमांक भरावा लागेल. त्यानंतर सुविधा केंद्रात बायोमेट्रिक प्रमाणिकरण केल्यानंतर तुम्हाला तुमचे हेल्थ आयडी मिळेल.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button