Sanjay Raut : संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ | पुढारी

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ

पुढारी ऑनलान डेस्क : विशेष पीएमएलए न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात अटक केली होती.

न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी विशेष न्यायालयाने सुनवावली होती. त्यानंतर ईडीकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. 4 ऑगस्टला ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर ईडीच्या अधिका-यांनी Sanjay Raut संजय राऊत चौकशीला सहकार्य करत नाही. असा ठपका ठेवत प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना समन्स बजावला आहे. त्यांची समोरासमोर चौकशी करणे गजरेचे आहे. त्यांची 6 ऑगस्टला चौकशी होणार आहे, असे सांगत राऊत यांना आणखी 10 ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी मिळावी, अशी मागणी केली. तर राजकीय सूड बुद्धीतून ही कारवाई करण्यात येत आहे, राऊत यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, असा युक्तिवाद राऊत यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता.

दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. आज ही मुदत संपत आहे. त्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता Sanjay Raut त्यांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात केली गेली.

आज 22 ऑगस्ट रोजी त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली. त्यानंतर आज विशेष पीएमएलए न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संजय राऊत Sanjay Raut यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

हे ही वाचा

संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

Back to top button