तपासासाठी आलेल्या बिहारच्या महिला पोलिसाने बावधनमध्ये घेतला गळफास | पुढारी

तपासासाठी आलेल्या बिहारच्या महिला पोलिसाने बावधनमध्ये घेतला गळफास

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारमधून आलेल्या पोलीस महिलेने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बावधन येथे गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कविता कुमारी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कविता कुमारी बिहारमधील मुजफ्फरपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. दरम्यान, एका गुन्ह्याच्या तपासासाठी बिहार पोलिसांचे एक पथक बावधन येथे आले होते. या पथकात कविता कुमारी देखील होत्या. हे पथक बावधन येथील विवा इन या हाॅटेलवर थांबले होते. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कविता कुमारी यांनी हाॅटेलमध्ये गळफास घेतल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Back to top button