राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार : आदित्य ठाकरे | पुढारी

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार : आदित्य ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार आहे. मुख्यमंत्री दिल्लीतून कधी कधी महाराष्ट्रात येतात. माझा ज्या मतदारसंघात दौरा होईल, तेथे ते देखील जातात. फोटो काढतात आणि परत येतात, अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सोमवारी टीकास्त्र सोडले.

शिवसेनेतील बंडाळीनंतर ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठका आणि विविध मतदारसंघांत आदित्य ठाकरे यांचे मेळावे असा दुहेरी कार्यक्रम शिवसेनेत सुरू आहे. मात्र, आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदित्य यांनी आपला नियोजित जळगाव दौरा रद्द केला. ‘मातोश्री’वर आलेल्या शिवसैनिकांशी मात्र त्यांनी संवाद साधला. राज्यात मुख्यमंत्री कोण हेच कळायला मार्ग नाही. कधी चिठ्ठी लिहिली जाते, कधी माईक खेचली जातो. या सर्व नाटकात हे सरकार नक्‍की कुणाचे, असा प्रश्‍न तरुणांनी विचारायला हवा. राज्यात दोघांचे जम्बो कॅबिनेट आहे. राज्यात पूर, अतिवृष्टी आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. पण उत्तर देण्यासाठी सरकार कुठे आहे, असा प्रश्‍नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

Back to top button