monkeypox : ‘मंकीपॉक्स’ची नको भीती; अशी घ्या काळजी! | पुढारी

monkeypox : ‘मंकीपॉक्स’ची नको भीती; अशी घ्या काळजी!

पुणे : ‘मंकीपॉक्स’ या आजाराबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्सबद्दल भीती न बाळगता आजाराबद्दल जाणून घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • काय काळजी घ्यावी?
  • बाधित व्यक्तीचे विलगीकरण करावे
  • बाधित व्यक्तीला मास्कने नाक आणि तोंड झाकायला सांगावे
  • रुग्णाची माहिती आरोग्य केंद्रात द्यावी
  • रुग्णाने वापरलेल्या वस्तूंचा वापर टाळावा
  • साबण, पाणी वापरून हात स्वच्छ ठेवावेत

मंकीपॉक्समुळे निर्माण होणारी गुंतागुंत
डोळ्यांमध्ये वेदना होणे किंवा अंधुक दिसणे
श्वास अपुरा पडणे,
श्वास घेताना त्रास होणे
छातीत दुखणे
शुद्ध हरपणे
अपस्माराचे झटके येणे
लघवी होण्याचे प्रमाण कमी होणे

कसा होतो प्रसार?
थेट शारीरिक संपर्क : शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव
अप्रत्यक्ष संपर्क : बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत
खूप वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यास श्वसन मार्गातून बाहेर पडणार्‍या थेंबांवाटे

कोणाला होऊ शकतो मंकीपॉक्स?
मधुमेह, रक्तदाब आणि इतर सहव्याधी असलेल्या व्यक्ती
प्रतिकारशक्ती कमी असणार्‍या व्यक्ती

लक्षणे
ताप थकवा, डोके दुखणे, स्नायूदुखी
घसा खवखवणे, खोकला येणे
कानामागे, गळ्याभोवती, काखेत किंवा जांघेतील लसिका ग्रंथींना सूज येणे त्वचेवर पुरळ

Back to top button