राशिभविष्य (दिनांक ३ जुलै २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दिनांक ३ जुलै २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष- नियोजित कामांमध्ये अडचणी येतील. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. वाद-विवादापासून दूर राहा. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस.

 

राशिभविष्य
वृषभ
वृषभ- कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. प्रत्युत्तर करू नका. वाहने सावकाश चालवा. अचानक खर्च उभे रहातील. मानसिक आरोग्य बिघडेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन- हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. धनलाभाचे योग संभवतात. त्यामुळे आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
कर्क
कर्क-चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कमवलेली संपत्ती, प्रतिष्ठा टिकवण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी कामी येईल.

 

राशिभविष्य
सिंह
सिंह- आजचा दिवस म्हणजे मेजवानीचा लाभ घ्याल. भाग्यकारक घटनांचा दिवस आनंद देऊन जाईल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल.

 

राशिभविष्य
कन्या
कन्या- समज-गैरसमजातून मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. कलह टाळावा. प्रतिक्रिया देताना सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
तुळ
तूळ – आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आनंददायी घटनांचा दिवस. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणी जाग्या होतील.

 

राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक – सातत्य, ध्यास यामुळे कामात यश मिळेल. खर्‍याअर्थाने इच्छापूर्तीचा दिवस असेल. प्रामाणिकपणामुळे अधिकारांमध्ये वाढ होईल.
राशिभविष्य
धनु
धनु – मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे. जुने आजार उद्भवतील. छातीसंबंधित आजार होण्याची शक्यता आहे.

 

राशिभविष्य
मकर
मकर – कितीही प्रयत्न केले तरी अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस.श्‍वसनासंबंधित विकार बळावण्याची शक्यता.
कुंभ -
कुंभ
कुंभ – मनासारख्या घटना घडतील. सौख्यकारक घटनांमुळे दिवस आनंदात जाईल. जोडीदाराची साथ लाभेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील.
राशिभविष्य
मीन
मीन- आज आपले आरोग्य उत्तम राहील. प्रसन्‍नता प्राप्त होईल. अचानक धनलाभाचे योग संभवतात. चांगल्या सात्विक मित्रमंडळींचा सहवास लाभेल.

Back to top button