शिर्डी : साई मंदिरात फुले-प्रसाद वाहण्यास परवानगी द्या, सिंधी समाजाच्यावतीने मागणी | पुढारी

शिर्डी : साई मंदिरात फुले-प्रसाद वाहण्यास परवानगी द्या, सिंधी समाजाच्यावतीने मागणी

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात भाविकांनी आणलेली फुले व प्रसाद वाहण्यास साई मंदिर प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी सिंधी समाजाच्यावतीने करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात प्रवेशबंदी तसेच साईबाबांंना फुले वाहणे, प्रसाद वाहने यालाही बंदी करण्यात आली होती.

मात्र आता सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे. राज्यातील कोणत्याही मंदिरात फुले अथवा प्रसाद वाहण्यास बंदी नाही. साईबाबा प्रशासनाने साई मंदिरात अद्यापही फुले व प्रसाद वाहण्यास बंदी केली आहे.

त्यामुळे फुलांचे व्यापरी, शेतकरी, तसेच मंदिर परिसरात असलेली फुलांचे दुकानदार तसेच प्रसाद विक्री करणारे दुकानदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने साई मंदिरात भाविकांना फुले व प्रसाद वाहण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जयकुमार कुकरेजा, संजय माखिजा, अशोक भागवानी, प्रेमकुमार छतवाणी आदींनी केली आहे.

Back to top button