‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ बॉडीबिल्डरची आत्महत्या  | पुढारी | पुढारी

‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ बॉडीबिल्डरची आत्महत्या  | पुढारी

विरार : पुढारी ऑनलाईन

अनेक मानाचे किताब जिंकणाऱ्या बॉडीबिल्डर अली सलोमनीने आत्महत्या केली आहे. त्याने ‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’सह अनेक मानाचे किताब जिंकले होते. त्याने विरारमधील राहत्या घरात गळफास घेऊन जीवनाची अखेर केली. बॉडीबिल्डर सलोमनीने तीन वेळा ‘वसईश्री’, एकदा ‘दहिसरश्री’ आणि ‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ या स्पर्धांचा किताब पटकावला. गेल्या अनेक वर्षांपासून अलीने अनेक तरुणांना शरीरसैष्ठ स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले आहे. 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सलोमनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. अलीच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. पत्नी घरी आल्यानंतर तिला अलीचा मृतदेह बेडरुममधील पंख्याला लटकताना दिसला. तिने यावेळी आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतले. 

संबंधित बातम्या

घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याचा मृतदेह विरार पश्चिम उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

Back to top button