ठाणे : दिवा फाटक ओलांडताना ट्रेनच्या धडकेत दोन ठार, एक गंभीर | पुढारी

ठाणे : दिवा फाटक ओलांडताना ट्रेनच्या धडकेत दोन ठार, एक गंभीर

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : दिवा रेल्वे फाटक क्रॉस करताना समोरून येणाऱ्या ट्रेनच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले. तर  एकजण गंभीर जखमी झाला. दीपक सावंत( वय २६), गीता शिंदे (३५) अशी मृतांची नावे अहेत.  महादेवी अमोल जाधव (२५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या संदर्भात अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

विशेष म्हणजेअनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून देखील मुंबई दिशेकडे असलेला अरुंद जिना वाढवण्यात येत नाही. त्यामुळे प्रवासी फाटकातून क्रॉसिंग करत आहेत. त्यामुळे वारंवार या परिसरात अपघात होत असल्याची माहिती संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी दिली.

हेही वाचलतं का?

Back to top button