महेंद्र चव्हाण ‘गडहिंग्लज नगराध्यक्ष श्री’चा मानकरी | पुढारी

महेंद्र चव्हाण ‘गडहिंग्लज नगराध्यक्ष श्री’चा मानकरी

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

येथील गडहिंग्लज नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने ‘गडहिंग्लज नगराध्यक्ष श्री’चा किताब पटकाविला. अनिल बिलवा व महेश जाधव हे दोघे रनरअप ठरले. महिलांमध्ये ठाण्याच्या मयुरी पोटे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या या स्पर्धेला राज्यभरातून 125 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा पाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शौकिनांची उपस्थिती होती. आकर्षक स्टेजरचना, विद्युत रोषणाई व तितक्याच पद्धतीचे गडहिंग्लज पालिकेचे नेटके नियोजन यामुळे या स्पर्धेला वेगळीच उंची मिळाली. 

खा. संजय मंडलिक, संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, ‘गोडसाखर’चे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, अ‍ॅड. सुरेश कुराडे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. मिस्टर आशिया सुनीत जाधव यांच्यासह प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले यांची विशेष उपस्थिती होती.

गांधीनगर यूथ सर्कलचे अध्यक्ष व नगरसेवक महेश कोरी यांनी स्वागत केले. या स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांना गडहिंग्लजचा शरीरसौष्ठवातील इतिहास सांगून पालिकेने याकरिता निधी दिला असला, तरी समाजातील अन्य शरीरसौष्ठव शौकिनांच्या मदतीने एवढी मोठी स्पर्धा घेणे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खा. मंडलिक, मुश्रीफ, अ‍ॅड. शिंदे, अ‍ॅड. कुराडे, नगराध्यक्षा कोरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शरीरसौष्ठवासाठी योगदान देणार्‍या नेताजी पालकर, झाकीर नदाफ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्पर्धेतील गटनिहाय विजेते ः 70 किलो – दिनेश कांबळे (ठाणे), तौसिफ मोमीन (पुणे), उमेश पांचाळ (मुंबई), प्रताप कलकुट्टीकर (सीमाभाग), शुभम भोईटे (सातारा). 75 किलो गट – महेश जाधव (पुणे), अफरोज तहसीलदार (सीमाभाग), अर्जुन कोचिकोरवी (मुंबई), नौशाद शेख (पुणे), गणेश दुसरीया (औरंगाबाद), 80 किलो गट – अनिल बिलवा (मुंबई), भास्कर कांबळे (मुंबई), संजय मालुसरे (सातारा), रावप्रभाकर पाटील (औरंगाबाद), अभिषेक खेडेकर (मुंबई).

85 किलो गट – मल्लेश धनगर (पुणे), आदिल बागवान (सातारा), सोहेल शेख (बीड), संकेत लंगरकर (कोल्हापूर), कृष्णा गोरे (कोल्हापूर).खुला गट-महेंद्र चव्हाण (पुणे), रोहित चव्हाण (सीमाभाग), हरफाज रजपूत (धुळे), प्रवीण पोळ (ठाणे), तुषार गवळी (ठाणे).

मेन्स फिजिक्स प्रकारात 170 सें. मी.हून कमी गटात विजय हप्पे (मुंबई), ख्रिस जॉन (पुणे), रोहित शर्मा (पुणे), आरबाज शेख (पुणे), रामा गुरव (पुणे), तर 170 से.मी. हून अधिक गटात गोकुळ वाकुडे (पुणे), संजय मकवाना (ठाणे), मुयरेश्वर पाटील (पुणे), गौरव यादव (सातारा), शुभम कानडू (मुंबई) यांनी यश मिळविले.

महिला गटात मयुरी पोटे, निधी सिंग, काजोल भाटिया (तिघीही ठाणे) यांनी अनुक्रमे यश मिळविले. इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशन, महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्यातून गांधीनगर यूथ सर्कल यांच्या सहयोगाने स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असो.चे प्रशांत आपटे व कोल्हापूर असोसिएशनचे राजेंद्र पोतदार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

Back to top button