‘ही’ आहे जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण | पुढारी

‘ही’ आहे जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण

जोहान्सबर्ग : जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेत विटवॉटर्सरँड बसीन येथे आहे. आतापर्यंत जगभरात उत्खनन झालेल्या सोन्यापैकी 30 टक्के सोनं याच खाणीतून बाहेर काढण्यात आले आहे.

अन्य प्रमुख खाणींमध्ये दक्षिण आफ्रिकेतीलच सुपर पिट, ऑस्ट्रेलियातील न्यूमाँट, इंडोनेशियातील ग्रासबर्ग आणि अमेरिकेतील नेवाडा खाणीचा समावेश होतो. सध्या सोन्याचे सर्वाधिक उत्खनन चीनमध्ये केले जाते. त्यानंतर कॅनडा, रशिया आणि पेरू या देशांचा क्रमांक लागतो. कंपन्यांचा विचार करता नेवाडामधील बॅरिक गोल्डस् ही कंपनी सोन्याचे सर्वाधिक उत्खनन करते. एका वर्षात सुमारे 35 लाख औंस इतक्या सोन्याचे उत्पादन या कंपनीकडून केले जाते. सोन्याच्या नव्या खाणींचा शोध लागत असला तरी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा असलेल्या खाणी दुर्मीळ आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जुन्या खाणींमधूनच सोन्याचे बहुतांश उत्पादन होते.

Back to top button