फुलराणी सायनाच्या ‘त्या’ फोटोंवर कमेंटचा पाऊस; हॉलिवूड अभिनेत्रीचे १०० गुण! (video) | पुढारी

फुलराणी सायनाच्या 'त्या' फोटोंवर कमेंटचा पाऊस; हॉलिवूड अभिनेत्रीचे १०० गुण! (video)

माले (मालदीव) : पुढारी ऑनलाईन 

भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आजकाल खेळापासून दूर असून ती पती परुपल्ली कश्यपसोबत मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. मालदीवमधील काही फोटो आणि व्डिडिओ सायनाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यानंतर अनेक स्टार आणि चाहत्यांनी या फोटोवर कॉमेन्टस्‌ केल्या आहेत. यात विशेष करून, हॉलिवूड अभिनेत्री सामांथा स्टीफेनचा ही यात समावेश आहे. 

सायनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला एक कॅप्शन लिहिले आहे की, ‘सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करण्याच्या मनःस्थितीत’. सायनाच्या या फोटोला सामांथा स्टीफेन १०० पैकी १०० गुण दिले आहेत. याचा अर्थ सामांथाने यावर पुर्ण सहमती दर्शविली आहे. यासोबतच सामांथाने ब्लॅक आणि यलो हार्ट असलेले ईमोजी पोस्ट केले आहे. 

अधिक वाचा : अक्षयच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलले!

सामांथासोबत या फोटोला अनेक दिग्गज स्टार्सनी लाईक्स आणि कॉमेंन्टस्‌ केल्या आहेत. यात माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री पूजा चोप्रा, मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान, अभिनेत्री आंचल मुंजाल, अभिनेत्री भूमिका चावला, अभिनेत्री लावण्या त्रिपाठी, अर्चना विजया, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीची छोटी मुलगी श्रीजा, अभिनेता रोहित बोस रॉय, विलास नायक आणि भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम यांनी कॉमेंन्टस्‌ केल्या आहेत. या फोटोवर भूमिका चावलाने लिहिले आहे की, ‘हा फोटो खूपच गोंडस आहे.’ लावण्या त्रिपाठीने लिहिले की, ‘सुंदर चित्र’. सुकांत कदमने या फोटोचे कौतुक केले. गौहर खान फोटो पाहून अवाक झाला. यासोबतच रोहित बोस रॉयने या फोटोवर लिहिले की, ‘तुमच्याकडे पाहिल्यावर असे वाटते की, तुम्ही तिथे खूप मस्ती करत आहात.’

अधिक वाचा : कंगनाला फैलावर घेणाऱ्या उर्मिला मातोंडकरना शिवसेनेकडून आमदारकीची बक्षिसी?

सायनाने गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी भारतीय शटलर पारुपल्ली कश्यपशी लग्न केले होते. याआधी सायना आणि कश्यप दोघेही जवळपास १० वर्ष रिलेशनशिप होते. सायना आणि परुपल्ली कश्यप यांनी काही आठवड्यांपूर्वी डेन्मार्क ओपन सुपर ७५० स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. 

 

(photo, video : nehwalsaina instagram वरून साभार)

Back to top button