‘स्प्लीन/ पांढरी वाढणे’ आणि आयुर्वेदिक उपचार | पुढारी

‘स्प्लीन/ पांढरी वाढणे’ आणि आयुर्वेदिक उपचार

पोटामध्ये डाव्या बाजूस वरील कोपर्‍यात spleen अवयव असतो. रक्तात नको असलेले जीवजंतू नाश करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेणे, रोगप्रतिकारशक्ती टिकविणे, तांबड्या पेशी, plate lets, यांचे निराकरण करणे अशी जीवनावश्यक कार्ये स्प्लीन करत असते. काही वेळा या spleen चा आकार वाढल्यामुळे विविध आरोग्य समस्या उत्पन्न होतात.

लिव्हरच्या विकाराप्रमाणेच spleen च्या विकारातही आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा उत्तम उपयोग होतो.

2) Spleen/  पानधरी वाढण्याची कारणे

टायफॉईड, टी.बी. syphilis इ. जीवाणू संसर्ग हिपॅटायसीस, मलेरिया, अ‍ॅनिमियाचा विकार यामुळे ीश्रिशशप वाढत असते. काही हृदयविकार, Portal hypotension, लिव्हरच्या शिरेतील गाठ, spleen च्या शिरेतील अवरोध  यामुळे देखील जास्त वाढते. Acute Heukemia, Lymphone, या कॅन्सरच्या प्रकारात देखील ीश्रिशशप वाढलेली आढळते. काही वेळा स्प्लीन वाढण्याचे कोणतेही कारण सापडत नाही.

3) Spleen वाढल्यानंतरच्या तक्रारी

Spleen वाढल्यामुळे पोट फुगणे, अस्वस्थता, भुकेच्या तक्रारी, पोटाचा आकार वाढणे, पचन बिघाड, लघवीला साफ न होणे, पोट दुखणे या प्राथमिक तक्रारी जाणवतात.

याचबरोबर हिमोग्लोबीन कमी होऊन पांढर्‍या पेशींची संख्या कमी होते. Spleen चा आकार  वाढल्यास पोट आणखी फुगून त्यामध्ये  पाणी साठू लागते. श्वास घेण्यास त्रास होते, रक्ताची टक्केवारी अधिक कमी होऊन अशक्तपणा वाढतो, अंगात ताप राहणे, पायाला गोळे येणे, मळमळणे, भूक खूप कमी होणे इ. लक्षणे दिसू लागतात. त्वचेचा वर्ण काळवंडून त्वचा कोरडी होते. अनेकदा या जोडीला लिव्हरचा आकार वाढल्याचे आढळते. 

स्प्लीन वाढल्यानंतर रक्त लघवीच्या तपासण्या, तसेच पोटाची सोनोग्राफी, एक्स-रे, CT Scan च्या तपासण्यांनी स्प्लीन वाढण्याचे कारण शोधले जाते. काही वेळा Bone Narrow Test, Liver Biopsy या तपासण्याही कराव्या लागतात. 

4) स्प्लीन वाढण्यावरील आयुर्वेदीय उपचार

वाढलेली ीश्रिशशप कमी करण्यासाठी अष्टविध परीक्षांनी रुग्णपरीक्षण करून औषधी योजना ठरवली जाते.  ….पुंखा, रोहितक, कुमारी, पुनर्नवा, यवक्षार, वजक्षार, मंड्रभस्म, ताम्रभस्म, प्रवाळ पंचामृत, गोमूत्र इ. पासून तयार झालेली संयुक्त औषधे वापरली जातात. वाढलेल्या ीश्रिशशप बरोबरच जलोदर झालेला असल्यास या उपचारांबरोबरच पोटाला औषधी तेल लावून,  अर्कपन्न उदरपट्टबंधन हा उपक्रम केला जातो. काहीवेळा सिराव्यध करून रक्तमोतण, विरेचन यांचीही मदत घ्यावी लागते.

5) आर्युेदिक औषधांचे आश्चर्यकारक परिणाम

वरील आयुर्वेदिक उपचार सुरू केल्यानंतर रुग्णाची भूक वाढते. Spleen चा आकार कमी होऊन फुगलेले पोट कमी होते. पचनशक्ती सुधारून अशक्तपणा कमी होऊन रक्ताची टक्केवारी सुधारते. जलोदर झाला असल्यास पोटातील पाणी कमी होऊन श्वासाचा त्रास बंद होतो. चिकाटीने उपचार सुरू ठेवल्यास spleen चा आकार खूप कमी होऊन आरोग्यसंपन्न जीवन प्राप्त होते.

डॉ. आनंद ओक

 

Back to top button