मुकूल रॉय यांनी भाजपला रामराम करताच केंद्राने झेड सुरक्षा काढून घेतली! | पुढारी

मुकूल रॉय यांनी भाजपला रामराम करताच केंद्राने झेड सुरक्षा काढून घेतली!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजपला रामराम करून तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले वरिष्ठ नेते मुकुल रॉय यांची झेड दर्जाची सुरक्षा केंद्रीय गृह मंत्रालयाने हटविली आहे. तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर रॉय यांनी आपली केंद्रीय सुरक्षा मागे घेतली जावी, असे पत्र गृह मंत्रालयाला पाठविले होते, त्यानुसार केंद्राने वरील निर्णय घेतला आहे. रॉय यांना प. बंगाल पोलिसांकडून सुरक्षा प्राप्त होणार आहे. 

अधिक वाचा : सीबीएसईकडून इयत्ता १२ वीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला! राज्य मंडळही त्याच मार्गाने जाणार?

झेड सुरक्षा श्रेणीअंतर्गत रॉय यांना सीआरपीएफचे 33 जवान तीन पाळ्यांमध्ये सुरक्षा देत होते. प. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी रॉय यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र निवडणूक निकाल आल्याच्या महिनाभरात त्यांनी भाजपला रामराम केला आहे. मुकुल रॉय यांचे पुत्र शुभ्रांशु रॉय यांची  सीआयएसएफ सुरक्षा गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने मागे घेतली होती. 

अधिक वाचा : ‘खोटं बोलण्यासाठी पीएम मोदींना नोबेल मिळायला हवं’

 

Back to top button