मराठा क्रांती मार्चा दिल्लीत धडकणार | पुढारी

मराठा क्रांती मार्चा दिल्लीत धडकणार

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा:

मराठा आरक्षणासह  (Maratha reservation) विविध मागण्यांसाठी राज्यभर भव्य मोर्चे काढल्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) दिल्लीत धडकणार आहे. केंद्रीय आरक्षण आणि आरक्षणाचा टक्का वाढविण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा मार्चा काढण्यात येणार आहे. संसदेचे अधिवेशन जाहीर होताच आंदोलनाची तारीख घोषित केली जाणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील मुख्यहस्तक्षेप याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील व समन्वयक किशोर चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

अधिक वाचा : एकनाथ खडसेंना ईडीकडून १४ दिवस मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर (Maratha reservation) दिलेला स्थगिती आदेश उठविण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहेच. परंतु त्यासाठी राज्य सरकारने ही स्थगिती हटावी, यासाठी भक्कमपणे नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक आरक्षणात बदल करण्याची मागणी देखील केली. परंतु यासोबतच महत्वाचे म्हणजे केंद्रीय आरक्षण आणि आरक्षणाची मार्यादेत वाढ आवश्यक असून त्यासाठी १२ डिसेंबर २०१२ सालापासून मराठा समाज केंद्राकडे पाठपुरावा करीत आहे.

अधिक वाचा : गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा : भाजप

यावेळी पुढे राजेंद्र दाते पाटील म्हणाले, राज्यात मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्यासाठी मागासवर्ग समितीची स्थापना केली होती. या समितीने वर्षभर अभ्यास करून अहवाल सादर केला. त्यानुसार यापूर्वीच्या राज्य सरकारने एसईबीसी कायदा २०१८ हा मंजूर केला होता. या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. परंतु ४१ दिवसांच्या लढ्यानंतर उच्च न्यायालयाने मराठ समाजाचे आरक्षण कायम ठेवले होते. 

अधिक वाचा : सातारा : उदयनराजेंच्या जादूच्या झप्पीची चर्चा! 

या निर्णयानंतर मराठा समाजात अनंदाचे वातावरण होते. परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यात आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. यावर सध्या सुनावणी सुरू असून आता १०२ आणि १०३ च्या घटना दुरुस्तीमुळे १० टक्के अधिकचे आरक्षण दिले आहे. त्यामुळे आरक्षणाची जी ५० टक्क्यांची मर्यादा होती, ती वाढली असून त्यामुळे मराठा आरक्षणाविरोधातील सर्व दावे दूर होणार आहेत, अशी शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली. 

अधिक वाचा : आष्टी : आमदार सुरेश धस यांची निर्दोष मुक्तता

तसेच केंद्रीय स्तरावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जो लढा २०१२ पासून सुरू आहे. त्यावर केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) दिल्लीत धडकणार आहे. या मोर्चाची तारीख दिल्लीतून जाहीर केली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. या मोर्चात आरक्षणाचा टक्का वाढविण्यासह इतरही विविध मागण्यांचा समावेश असेल. परंतु ते लवकरच सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रकृती ठीक नसल्याने पत्रकार परिषदेला विनोद पाटील येऊ शकले नाही. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शिवाजी जगताप, सुरेश वाकडे, योगेश बहाद्दुरे, अभिजित देशमुख, मनोज गायके, प्रभाकर मते,  महिला समन्वयक रेखा वाहटूळे, सुकन्या भोसले यांची उपस्थिती होती.

Back to top button