‘थंडगार’ उन्हाळ्यासाठी ‘या’ खास टिप्स तुमच्यासाठी! | पुढारी

'थंडगार' उन्हाळ्यासाठी 'या' खास टिप्स तुमच्यासाठी!

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क 

आज ऊन जरा जास्तचं आहे…कधी संपतोय हा उन्हाळा कुणास ठाऊक? नुसता जीव नकोसा झालाय, या गर्मीनं…घामाच्या धारा लागल्या आहेत… वाऱ्याची एक झुळूकदेखील येत नाहीये…घरातील पंख्याचा वारासुध्दा गार येईना. गरम गरम वाफांनी नुसता घालमेल झालंय. इतका थकवा आलाय ना की, काही कामचं करायला नको वाटतंय, जाऊन पाण्याखाली बसावं असं वाटतयं…असाचं अनुभव तुम्हालाही या कडक उन्हाळ्यात येतोय ना! आम्हाला पण येतोय. मग, काय करायचं आता. ऊन तर आपण कमी करू शकत नाही. पण, उन्हाळ्यातदेखील फ्रेश राहण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलोय. 

This Summer is Unusual,' Says IMD With no Heatwave Forecasts

ऐन उन्हाळ्यात, फिट राहण्यासाठी आणि गरमीचे चटके कमी करण्यासाठी काय उपाय आहेत? आपली प्रतिकारशक्ती टिकून राहावी, आजारी पडू नये, यासाठी आपण घरच्या घरी काय उपाय करावेत? यासाठी अगदी सोपे उपाय आम्ही तुम्हाला देत आहोत. 

उन्हाळ्यात जे कामासाठी बाहेर फिरतात वा फिल्ड वर्कवर असतात; त्यांना विशेषत: अधिक काळजी घ्यायला हवी. काही जणांना तर उन्हातून आल्यानंतर डोकं दुखायला लागतं. तसेच अनेकांना ऊन सहन होत नाही. अशावेळी उष्णता वाढणे, डोळे रखरखणे, जेवण कमी जाणे, अधिक झोप येणे, मळमळ आणि चक्कर येणे,  थकवा, अशक्तपणा येणे यासारखे प्रकार होतात. या पुढील टिप्स वापरून तुम्ही उन्हाळ्यातदेखील फिट आणि फ्रेश राहू शकता. 

Did You Know About These Common Summer Diseases?

सैलसर कपडे घालणे – उन्हाळ्यात घट्ट कपडे वापरू नये. घट्ट कपडे वापरल्यास घाम येऊन अंगावर रॅशेस येतात. सुती कपडे वापरणे कधीही चांगले. त्यामुळे अंगातील घाम शोषला जातो. मऊ आणि सुती कपड्यांमुळे उष्णतेचा दाह अधिक होत नाही. 

12 Best Summer Health Care Tips In Marathi - उन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या  आपल्या आरोग्याची काळजी - Marathi Health Blog

अनावश्यक उन्हात जाणे टाळणे – अनावश्यक उन्हात जाणे टाळावे. काही महत्त्वाचे काम असेल तरचं दिवसा बाहेर पडावे. 

जपा डोळ्यांचं सौंदर्य |

उन्हापासून संरक्षण – उन्हात बाहेर पडल्यानंतर टोपी घालावी. स्कार्फ बांधावे, छत्रीही उत्तम पर्याय आहे. यामुळे उन्हापासून संरक्षण होईल. काही जणांना घाम येऊन अंगावर ॲलर्जी होते, जसे की पुरळ येणे, लाल चट्टे उठणे. उन्हापासून बचावासाठी या गोष्टा केल्यास असे प्रकार होणार नाहीत. 

Live Chennai: Aware of 'Kathiri Veyil' Dates – Commencing from May 4 to May  28, 2014!,Kathiri Veyil Dates,Agni Natchathiram dates,Agni Kathiri  Veyil,Agni Natchathiram dates in 2014,Agni Natchathiram dates 2014,2014  Agni Natchathiram dates

डोळ्यांचे संरक्षण – बाहेर जाताना सनग्लासेस, गॉगल वापरणे. त्याचबरोबर, दिवसांतून तीन ते चार वेळा डोळ्यांवर गार पाणी मारणे. डोळ्यांना गारवा मिळण्यासाठी हे रोज करणे आवश्यक आहे. काकडीचे गोल काप कापून ते डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना गारवा तर मिळतोच शिवाय काळी वर्तुऴे निघून जाण्यास मदत होते. 

उन्ह्याळात डोळ्यांची 'अशी' काळजी घ्या - पोलीसनामा (Policenama)

त्वचेची काळजी – रखरखत्या उन्हात सन्सक्रीम वापरणे खूप महत्त्वाचे आहे. काहींना उन्हात गेल्यानंतर टॅनिंग होते किंवा चेहरा काळवंडतो. अशा वेळी बाहेर पडताना सनस्क्रीम लावणे गरजेचे आहे. टॅनिग घालवण्यासाठी दही, लिंबू, बेसन पीठ, हळद, कोरफड, दूध, मसूर डाळीचं पीठ तसेच स्क्रबरही वापरता येते. त्याचबरोबर, मुलतान माती, चंदन पावडरचा मास्कचाही उपयोग करता येतो. दिवसांतून तीन-चार वेळा चेहरा धुतल्यास धूळ, पिंग्मिंटेशन, पुरळपासून सुटका होण्यास मदत होते.  

खीरा है गर्मी के मौसम के लिए उपयोगी – Business Sandesh

थकवा घालवण्यासाठी – तापमानाचा पारा वाढला की, घामाच्या धारा लागतात. अशक्तपणाही जाणवतो. कधी-कधी इतका थकवा येतो की, काम करण्यासाठी अंगात त्राण राहत नाही. यासाठी पूर्ण झोप आणि योग्य, सकस आहार घेणं महत्त्वाचं आहे.  

Cucumber Desi खीरा ककड़ी देसी | Rasoidas.comअपने डाइट में चुकंदर को शामिल कर इन बिमारियों से छुटकारा पा सकतें है -  Apani Rasoi | DailyHunt

योग्य आहार – उन्हाळ्यात उष्णता वाढवणारे पदार्थ कमी खावेत. जसे की चिकन, अंडी, पपई वगैरे. शाकाहारी पदार्थांवर भर द्यावा. पचायला जड असणारे पदार्थ टाळावेत. द्रव्ययुक्त पदार्थ लिंबू सरबत, कोकम, आवळा सरबत, ज्यूस प्यावे. फळे खावीत. पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे कलिंगड वगैरे खावीत. काकडी, बीट, टोमॅटो यावर भर द्यावा. दही, ताक, मठ्ठा, नाचण्याची आंबील प्यावी. भरपूर पाणी प्यावे. परंतु, अतिथंड पाणी पिणे टाळावे. मातीच्या माठातले पाणी पिणे कधीही चांगले. 

काकडी करेल कूssल!; 'या' ५ रेसिपी उन्हाळ्यात देतील थंडावा - Marathi News |  Cucumber recipes to make this summer cool | Latest health News at Lokmat.com

पुरेशी झोप – उन्हाळ्यात आपल्या दिनचर्येत बदल करावा. पुरेशी झोप घ्यावी. गर्मी होते म्हणून रात्री उशीरापर्यंत झोप लागत नाही. पुन्हा सकाळी कामावर जाताना किंवा लवकर उठताना त्रास होतो. शिवाय झोप न झाल्यास दिवसभर कंटाळा येतो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे. 

Get a Good Night's Sleep. Tips for the Right Pillow Selection.

व्यायाम – सकाळी उठून किमान अर्धा तास चालावे. बैठे काम करणाऱ्यांनी तर चालणे महत्त्वाचं आहे. घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी-सलग १ तास १ तास एका जागी बसू नये. मधून मधून उठावे. थोडं चालावं. सकाळच्या वेळेला सूर्यनमस्कार घालावे, योगासने करावीत अथवा ॲरोबिक्स केलं तरी चालेल. 

How to create an exercise routine you'll actually stick to - CNET

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी – प्रतीकारशक्तीसाठी घरगुती काढाही करता येतो. सी व्हिटॅमीन असणारी फळे खावीत. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. तुळशीच्या पानांच रस, आवळ्याचा रस तसेच वनौषधी काढा घेऊन तुम्ही प्रतीकारशक्ती वाढवू शकता. उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढावी आणि आजारी पडू नये म्हणून दिवसांतून दोन वेळा आंघोळ करणेही गरजेचं आहे. थंड पाण्याने आंघोळ केल्यास उष्णतेचा दाह कमी होतोचं शिवाय फ्रेश देखील वाटते. 

100 Quotes About Happiness to Lift Your Mood

रखरखत्या कडक उन्हाळ्यात थंडगार होण्यासाठीच्या या टिप्स तुम्हाला नक्कीचं उपयोगी पडतील. 

(सर्व फोटो संग्रहित)

Back to top button