भारत-चीन तणाव: नेपाळने दिला ‘हा’ खास सल्ला | पुढारी

भारत-चीन तणाव: नेपाळने दिला ‘हा’ खास सल्ला

काठमांडू : पुढारी ऑनलाईन 

भारताचा भूभाग आपल्या हद्दीत दाखवून त्याचा नकाशा आपल्या संसदेत संमत करणाऱ्या नेपाळने भारत आणि चीन या आपल्या दोन शेजाऱ्यांना एक खास सल्ला दिला आहे. चीन आणि भारत या उभय देशांनी जागतिक शांततेसाठी त्यांचीतील मतभेद शांततापूर्ण मार्गाने सोडवावे, असे म्हटले आहे. 

चीनचा तिबेटमध्ये युद्ध सराव

नेपाळने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात ‘भारत-चीन देशांमधील वाद हा शांततेच्या मार्गाने सोडवला जावा या मताचा नेपाळ आहे. आमचा देश कायमच जागतिक शांततेच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. आमचे मैत्रिपूर्ण शेजारी देश भारत आणि चीन या दोन देशांत लडाखच्या गलवान भागात जो काही वाद झाला तो हे दोघे शांततापूर्ण मार्गाने सोडवतील, असा नेपाळला विश्वास आहे.’ असे नमुद केले आहे. 

दरम्यान, भारत आणि नेपाळमध्येही सीमेवरून वाद निर्माण झाला आहे. याच प्रकरणात नेपाळी सेनेने भारतीय युवकांवर गोळीबार केला होता. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला होता. 

अखेर लडाखमधील ‘त्या’ महत्वपूर्ण पुलाचे काम पूर्ण

दरम्यान, 15 -16 जूनला गलवानमध्ये चीन आणि भारत यांच्या सैन्यामध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. ही झटापट चीनने ताबा रेषेची सद्यपरिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यानंतर झाली होती. भारताने ही परिस्थिती टाळता आली असती जर चीनने वरिष्ठ स्तरावर झालेल्या कराराचे काळजीपूर्वक पालन केले असते.

Back to top button