Satara : सातार्‍यात कॉलेज युवतीची छेड | पुढारी

Satara : सातार्‍यात कॉलेज युवतीची छेड

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यातील एका महाविद्यालय परिसरात रोहित कुंभार (रा. करंजे, सातारा) या युवकाने महाविद्यालयीन युवतीची दि. 23 रोजी छेड काढली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयित आरोपी रोहित याने ‘माझ्या सोबत प्रेमसंबंध कर, माझ्या सोबत रिलेशनमध्ये रहा, माझ्या विरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घे,’ असे म्हणत कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी देत दमदाटी केली. तसेच अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन करून त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Back to top button