चाकण : कांद्याची 4 हजार क्विंटल आवक | पुढारी

चाकण : कांद्याची 4 हजार क्विंटल आवक

चाकण : पुढारी वृत्तसेवा : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी (दि. 20) कांद्याच्या आवकेत घसरण झाली. चाकण मार्केटमध्ये कांद्याची 8 हजार पिशवी (4 हजार क्विंटल) आवक होऊन कांद्याला 800 ते 1 हजार 300 रुपये एवढा कमाल भाव मिळाला.

कांद्याच्या दरात मागील महिनाभरात सातत्याने घसरण सुरू आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडालेला असताना कांद्याचे दर मात्र नीचांकी पातळीवर आले आहेत.

चाकण मार्केटमध्ये नाफेडमार्फत कांदा खरेदीचे प्रयोजन नसल्याचे मार्केटचे इनचार्ज गोविंद दौंडकर यांनी सांगितले. चाकण मार्केटमध्ये यापूर्वी नाफेडमार्फत कांदा खरेदीचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, नंतर त्यात खंड पडला.

ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत; फडणवीस यांची टीका

बटाटे महागच

पश्चिम बंगालमध्ये यंदा बटाट्याचे उत्पादन कमी झाले आहे. बटाटे स्टोअरमध्ये ठेवण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सध्या बटाट्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे.

घाऊक बाजारात बटाट्याची आवक कमी झाल्याने बटाट्याचे दर वाढले असून, बटाट्याचे उत्पादन कमी झाल्याने भाव वाढलेले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

चाकण मार्केटमध्ये बुधवारी बटाट्याची 2 हजार पिशवी (1 हजार क्विंटल) आवक होऊन बटाट्याला 1 हजार 400 ते 1 हजार 800 रुपये एवढा दर मिळाला.

 

 

Back to top button