देवेंद्र फडणवीस, “ठाकरे सरकारने सामान्यांच्या पाठीत खंजीर खुपसला” | पुढारी

देवेंद्र फडणवीस, "ठाकरे सरकारने सामान्यांच्या पाठीत खंजीर खुपसला"

गडचिरोली, पुढारी ऑनलाईन : “सरकारने गरीब शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा नालायकपणा केला आहे. हिंमत असेल तर मुंबईतील टॅक्स वसूल करून दाखवा. कोरोना काळात बारमालकांना सरकारने मदत केली. महाविकास आघाडीला शेतकरी कमी, तर बेवड्यांची चिंता जास्त आहे. विदेशी दारूवरचा कर कमी केला. पण, शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही”, अशी सडकून टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

भाजपाने सुरू केलेल्या जनआक्रोश यात्रेदरम्यान गडचिरोली आयोजिक केलेल्या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, “२०२४ ला भाजपाचं बहुमताने सत्तेवर येणार आहे. यशवंत जाधव यांना भ्रष्टाचाराचे केवळ १० टक्के मिळाले, ९० टक्के गेले कुठे? जे सरकार धोक्यानं आलं, ते धोकात देतं. सामान्य माणसाला त्रास देणाऱ्या सरकारला वठणीवर आणणार. ठाकरे सरकार सामान्यांच्या पाठीत खंजीत खुपसतंय. धान खरेदी भ्रष्टाचार सुरू आहे. धान उत्पादकांना १००-१५० कोटींचा बोनस देता आला नाही”, अशीही टीका फडणवीस यांनी केली.

“शिवसेनेच्या यशवंत जाधवांनी ४०० कोटींची संपत्ती घेतली. भाजपा सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना २४ तास वीज देऊ. ठाकरे सरकार गरीबांचा विचार करणार नसेल तर मोदी सरकार करेल. गोदामात धान्य सडू दिलं. पण गरिबांनी दिलं नाही. सरकारने अनेक योजना बंद केल्या. ओबीसीचं आरक्षण वाचविण्याचं काम मोदींनी केलं. राज्य सरकारनं ओबीसींंचं आरक्षण घालवलं”, असंही फडणवीस म्हणाले.

हे वाचलंत का?

Back to top button