gold price Increase
gold price Increase

Gold Price Update : सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Price Update : सराफा बाजारात सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. शुद्ध सोन्याचा म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ५१,३१३ रुपयांवर आला आहे. याआधी शुक्रवारी १ एप्रिल रोजी सोन्याचा दर ५१,६३८ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. आज त्यात घट झाली आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीचा आजचा प्रति किलो दर ६६,७३७ रुपये आहे.

इंडियन बुलियन अँड ज्लेवर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम ५१,३१३ रुपयांवर सुरु सुरु झाला. तर २३ कॅरेट सोने ५१,१०८ रुपये, २२ कॅरेट सोने ४७,००३ रुपये, १८ कॅरेट सोने ३८,४८५ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,०१८ रुपयांवर होता. चांदीचा प्रति किलो दर ६६,८८९ रुपयांवरुन ६६,७३७ रुपयांवर आला आहे. (हे दुपारी २ पर्यंतचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या मागणीतील तेजी कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड दरात ०.३ टक्के घसरण दिसून आली. यामुळे सोन्याचा दर (Gold Price) प्रति औंस १,९१७ रुपयांवर आला. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news