Virat vs Babar : बाबर आझमने शतक झळकवताच विराट कोहली ट्रोलर्सच्या निशाण्यावर! | पुढारी

Virat vs Babar : बाबर आझमने शतक झळकवताच विराट कोहली ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या क्रिकेटच्या युगात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat vs Babar) यांच्यात ‘महान खेळाडू’ संदर्भात तुलना केली जात आहे. यापैकी कोणीही मोठी खेळी खेळली किंवा खराब फॉर्ममध्ये गेला तर तो चर्चेत येतो. चाहते दोघांची तुलना करू लागतात.

यावेळीही असेच काहीसे घडले आहे. बाबरने दोन वर्षांनंतर शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कराची कसोटीत १९६ धावांची शानदार खेळी खेळली. पाकिस्तानी कर्णधाराने शतकाचा दुष्काळ संपवला असला तरी कोहली अजूनही संघर्ष करत आहे. त्याला गेल्या २७ महिन्यापासून तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी २०) शतक झळकावता आलेले नाही. (Virat vs Babar)

बाबर हा पाकिस्तानचा कोहली नाही

बाबरने शतक झळकावत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात मोठा वाटा उचलला. मात्र, शतकवीर बाबरचा फटका भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला बसत असून तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावरून नेटकरी मजेशीर अशी मिम्स व्हायरल करताना दिसत आहेत. (Virat vs Babar)

एका नेटक-याने गँग्स ऑफ वासेपूर-२ चित्रपटातील अभिनेत्री रिचा चड्ढाच्या सीनचा फोटो शेअर केला आहे. यात तो म्हणतो की, बाबरने फेब्रुवारी २०२० नंतर पहिले शतक झळकावले आहे. आता चाहते विराट कोहलीला ‘कब खून खोलेगा रे तेरा’ विचारत आहेत. आणखी एक यूजरने मिममध्ये म्हणतो की, ले – बाबर आझम पाकिस्तानचा विराट कोहली नाही. आता लोकांना हे वाक्य आपापल्या परीने समजते. (Virat vs Babar)

बाबरने प्रथमच कोहलीला मागे टाकले….

त्याचवेळी, आणखी एका पाकिस्तानी यूजर म्हणतो की, बाबर आझमने आपल्या करिअरमध्ये प्रथमच आयसीसी क्रमवारीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. बाबर आझम जागतिक क्रिकेटचे नेतृत्व करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणखी एका पाकिस्तानी यूजरने लिहिलंय की, बाबर आझम कसोटी क्रमवारीत ८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर कोहली ९ व्या क्रमांकावर घसरला आहे. (Virat vs Babar)

बाबरने फेब्रुवारी २०२० नंतर पहिले शतक झळकावले

खरेतर बाबर आझमने फेब्रुवारी २०२० मध्ये बांगलादेशविरुद्ध आपले शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. त्यावेळी त्याने रावळपिंडी कसोटीत १४३ धावांची खेळी खेळली. यानंतर आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कराची कसोटीत आपले शतक (१९६) झळकावले आहे.

Back to top button