किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा | पुढारी

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

पुणे, पुढारी वृत्‍तसेवा : किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. अनेक वर्षांपासून शिवजयंती निमित्‍त शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जातो. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शिवनेरी किल्ल्यावर जन्मसोहळ्याला उपस्थित राहिले. तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेसुद्धा शिवनेरीवर उपस्‍थित होते. यावेळी शिवनेरीवर शिवजन्मोत्सव पाळणा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोजावला.

छत्रपती संभाजीराजे यावेळी बोलताना म्‍हणाले, आज आपण शिवजयंती साजरी करत असताना आत्मचिंतनाची गरज आहे. महारांजाचे विचार आपण कसे अंगीकृत करू शकतो. महाराज्‍यांच्या स्वराज्यातून आपण काय घ्‍यायचे, हे आज पहाणे गरजेचे आहे.

संभाजीराजे म्हणाले…

आज शिवनेरीवर येण्यासाठी शिवभक्‍तांना थांबवावे लागत आहे. आज फक्‍त निमंत्रितांना या सोहळ्यास उपस्थित राहण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, येथील सर्व परिस्थिती आणि एकदा हेलिकॉप्टरवर दगडफेक केली होती. त्यामुळे आता काही बंधने घालण्यात आलेली आहे.

हे ही वाचलं का  




Back to top button