अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनात ७ जवान शहीद | पुढारी

अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनात ७ जवान शहीद

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अरुणाचल प्रदेशमध्ये रविवारी गस्तीवर गेलेले ७ जवान हिमस्खलनात बेपत्ता झाले होते. आज (दि. ८) त्या बेपत्ता जवानांचे मृतदेह सापल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. हिमस्खलनाची घटना कामेंग सेक्टरमधील पर्वतरांगामध्ये घडलेली होती.

रविवारी जवानांचे गस्तीचे पथक या भागात गस्तीसाठी निघालेले होते. त्यावेळी हिमस्खलन झाल्यामुळे जवान त्यात अडकले. या बेपत्ता जवानांचा शोध आणि मदत कार्यासाठी विशेष टीम घटनास्थळी विमानाने पाठविण्यात आलेली होती.

खराब हवामान या परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे बचावकार्यातही अडथळे येत होते. अरुणाचल प्रदेशातील ४ राष्ट्रीय महामार्गांसहीत ७३१ पेक्षा जास्त रस्ते बंद करण्यात आलेले आहेत.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे सर्वत्र गाड्या अडकून पडलेल्या आहेत. हिमस्खलन सतत होत असल्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टीसाठी जाणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर स्थानिक लोकांचे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे.

हे वाचलंत का?

Back to top button